उच्चशिक्षित तरुणी झाली गावाची कारभारीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:11+5:302021-02-14T04:26:11+5:30

राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट ...

A highly educated young woman became the caretaker of the village | उच्चशिक्षित तरुणी झाली गावाची कारभारीन

उच्चशिक्षित तरुणी झाली गावाची कारभारीन

Next

राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून रीता हनुमंते निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने तालुक्यात सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान रीता हनुमंते यांना मिळाला आहे. रीता हनुमंते यांनी एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरपंचपदी निवड झाली असली, तरी शिक्षण सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही रीता हनुमंते यांनी जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज केला होता. अपक्ष असताना राजकीय पक्षांना, आघाड्यांच्या उमेदवाराला पराजीत करून विजय संपादन केला. त्यांच्या चार अपक्ष उमेदवार निवडून आले. यामध्ये उच्चशिक्षित म्हणून रीता हनुमंते यांच्या गळात सरपंचपदाची माळ पडली.

कोट

नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले. मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आणि माझी धिडशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी निवड झाल्यामुळे मी सर्व मतदाराचे आभार मानते. मी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून, सर्वोतोपरी गावाचा विकास करणे, हाच माझा हेतू आहे.

- रीता हनुमंते, नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत, धिडशी

Web Title: A highly educated young woman became the caretaker of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.