वर्धा नदीच्या मुंगोली पुलावर हायवा आदळला
By admin | Published: January 16, 2017 12:40 AM2017-01-16T00:40:54+5:302017-01-16T00:40:54+5:30
वर्धा नदीच्या मुंगोली नजीक असलेल्या पुलावर रविवारी सकाळी ११.३० वाजता हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील रेलिंगवर आदळला.
घुग्घुस : वर्धा नदीच्या मुंगोली नजीक असलेल्या पुलावर रविवारी सकाळी ११.३० वाजता हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील रेलिंगवर आदळला. यात मोठी दुर्घटना टाळली असून चालक प्रदीप कामतवार बचावला.
मुंगोली खाणीतून कोळसा घेऊन येणारा ट्रक क्र. एमएच ४० वाय ९६२९ वर्धा नदीवरील पुलाच्या रेलिंगवर आढळल्याने रलिंगवरून ट्रकचे पुढील चाक पुलाच्या खाली येऊन रेलिंगमुळे अडकला. यापूर्वी याच ठिकाणी झालेल्या अपघातात रेलिंग नसल्याने तीन ट्रक पुलावरून नदीत कोसळले होते.
शनिवारी सकाळी कोळसा वाहतूक करणारा हायवा ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या ४० फूट खोल खाईत उलटला.
त्यानंतर रविवारीचा अपघातदेखील स्टेअरिंग लॉकमुळेच झाल्याचे बोलले जात असले तरी मुंगोलीकडून पुलापर्यंत रस्त्याच्या उतार भाग असल्याने डिझेल बचतीचा फंडा वाहन चालक वापरत असतात. तेथे वळण रस्ता असल्याने अपघात होत असतात, असे कामगारांकडून सांगण्यात येते. रविवारच्या अपघातादरम्यान सायकलस्वार बचावला. (वार्ताहर)