कोठारी गावातून जाणारा महामार्ग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:35+5:302021-08-28T04:31:35+5:30

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश विधिमंडळ ...

The highway passing through Kothari village should enhance the beauty of the village | कोठारी गावातून जाणारा महामार्ग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा

कोठारी गावातून जाणारा महामार्ग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा

Next

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कोठारी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता जयस्वाल, कार्यकारी अभियंता मिश्रा, उपकार्यकारी अभियंता बोबडे यांच्यासोबत या विषयासंदर्भात पाहणी दौरा केला. यावेळी नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने दोन्हीकडून रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. ती वाढवत झाडे लावण्यासाठी जागा ठेवावी असे निर्देश दिले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेवटपर्यंत सिमेंट नाली असावी, रस्ता दुभाजकाच्या मधल्या भागात पथदिवे लावावेत, नाल्यापासून तलावापर्यंत रस्ता दुभाजक, पथदिवे व नाली बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. याबाबत त्वरित अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार, सरपंच मोरेश्वर लोहे, उपसरपंच सावित्रा मोहुर्ले, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल टिंबडिया, संजय सिडाम, तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, विलास राजुरकर, अमोल कातकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: The highway passing through Kothari village should enhance the beauty of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.