डोसअभावी अनेकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:46+5:302021-07-28T04:29:46+5:30

खबरदारी पाळतानाच नागरिक लसीकरणाकडे लक्ष देत आहेत. परंतु पुरेसे डोस मिळत नाहीत. त्यामुळे लसीकरण करण्याची आरोग्य विभागाकडे व्यापक ...

Hiramod of many due to lack of dose | डोसअभावी अनेकांचा हिरमोड

डोसअभावी अनेकांचा हिरमोड

Next

खबरदारी पाळतानाच नागरिक लसीकरणाकडे लक्ष देत आहेत. परंतु पुरेसे डोस मिळत नाहीत. त्यामुळे लसीकरण करण्याची आरोग्य विभागाकडे व्यापक क्षमता असूनही केवळ डोसअभावी बरेच केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लसीकरणाचा वेग असाच मंद राहिला तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण होणे अवघडच असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ३५०पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे केंद्र बंद ठेवाव्या लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. परिणामी चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे.

Web Title: Hiramod of many due to lack of dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.