ऐतिहासिक जटपूरा गेट उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:16 AM2017-10-22T00:16:51+5:302017-10-22T00:17:02+5:30

सतत विकास आणि लोककल्याणाचा ध्यास उराशी बाळगून सेवारत असणारे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे,

 The historic Jatpura gate will be bright | ऐतिहासिक जटपूरा गेट उजळणार

ऐतिहासिक जटपूरा गेट उजळणार

Next
ठळक मुद्देथीम लाईटींगच्या कामाचे भूमिपूजन : चांदा ते बांदा योजना प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सतत विकास आणि लोककल्याणाचा ध्यास उराशी बाळगून सेवारत असणारे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ.नाना श्यामकुळे यांनी केले.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक जटपूरा गेटवर थीम लाईटींगच्या कामाच्या भूमिपूजन समारंभात आ.श्यामकुळे बोलत होते. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करू, असेही आ. श्यामकुळे यावेळी बोलताना म्हणाले. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत दोन कोटी ३५ लाख रुपये किंमतीच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाºया ऐतिहासिक जटपूरा गेटच्या थीम लाईटींगच्या कामाच्या भूमिपूजन आ. नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहूल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणाºया जटपूरा गेट आता थीम लाईटींगच्या माध्यमातून उजळणार असून विविध दिनविशेष व सणांचे महत्व अधोरेखित करत त्या रंगांची उधळण नेमक्या व बोलक्या स्वरूपात जटपुरा गेटवर प्रतिबिंबीत होणार आहे.
अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा विकास प्रकल्प चंद्रपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणार असून त्या माध्यमातून शहराच्या ऐतिहासिक पाऊलखुणा ठळकपणे अधोरेखित होणार आहे. येत्या सहा महिन्यात जटपूरा गेटच्या थीम लाईटींगचे हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मनपाचे नगरसेवक तसेच शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title:  The historic Jatpura gate will be bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.