चंद्रपुरातील ऐतिहासिक जुनोना जलमहल नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:04 AM2018-09-21T11:04:18+5:302018-09-21T11:08:47+5:30

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Historic Junona waterpalace in Chandrapur is deteriorating | चंद्रपुरातील ऐतिहासिक जुनोना जलमहल नष्ट होण्याच्या मार्गावर

चंद्रपुरातील ऐतिहासिक जुनोना जलमहल नष्ट होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देपुरातत्व विभागाचे दुर्लक्ष स्थळाचा विकास करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्हा ऐतिहासिक गोंडकालिन अनेक वास्तुकरिता ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भाच्या भुप्रदेशावर ८०० वर्र्षे राज्य करणारे गोंडराजांनी आपल्या कार्यकाळात किल्ले, मंदिरे, समाध्या, बावडया आदी वास्तुचे बांधकाम केले आहे. त्यापैकीच एक गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या काळात बांधकाम झालेले जुनोना गावाच्या तलावाच्या काठावरील जलमहल आहे. हे जलमहल अजुनही पुरातत्व विभागाचे लक्ष न गेल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इको-प्रो व्दारा जलमहल परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जलमहल वास्तुची पुरातत्व विभागाने नोंद घेऊनसंवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. सदर परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी इको- प्रोने यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे केली.

जलमहलचा इतिहास />चंद्र्रपुरात गोंड राज्याची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे ५०० वर्षांपूर्र्वी गोंड राज्याचा कारभार बल्लारपूर येथून सुरू होता. तत्कालिन गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा (इ.स.१४७२ ते १४९७) यांच्या काळात जुनोना तलाव व तलावाच्या काठावर बांधकाम करण्यात आले होते. खांडक्या बल्लाळशहाची प्रकृती लहानपणापासून निरोगी नव्हती. शरिरावर खांडके असल्याने प्रकृती नेहमीच खालावलेली असायची. प्रकृती सुधारणेसाठी राणी हिताराणीने जुनोना जंगलातील तलावाच्या काठावर जलमहल बांधले. यानंतर गोंडराजांनी आपली राजधानी चंद्रपूरला हलविल्यानंतर जुनोना येथील जलमहलचा संदर्भ इतिहासातून वगळण्यात आला. मात्र अजुनही हा परिसर आणी जलमहल सुस्थितीत आहे. जंगल, तलाव व ऐतिहासिक गोंडकालीन जलमहलाची योग्य सांगड घातल्यास चंद्रपूर शहरानजिक निसर्गरम्य पर्यटनकेंद्र तयार होऊ शकते.

Web Title: Historic Junona waterpalace in Chandrapur is deteriorating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास