चंद्रपूर जिल्ह्यातील सिंगारपठारच्या डोंगरावर ऐतिहासिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:00 AM2020-12-15T07:00:00+5:302020-12-15T07:00:16+5:30

Chandrapur News जिवती तालुक्यातील सिंगारपठार गावाच्या दक्षिण भागात माणिकगड पहाडाच्या डोंगररांगा आहे. याच डोंगररांगात एका डोंगरावर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गालगत पुरातन काळात ऐतिहासिक वास्तू उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ते काम आजही दगडी पाया बांधून अर्धवट स्थितीत पडलेले दिसते.

Historic place on the hills of Singar Plateau in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील सिंगारपठारच्या डोंगरावर ऐतिहासिक ठेवा

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंगारपठारच्या डोंगरावर ऐतिहासिक ठेवा

Next
ठळक मुद्देआजही दिसून येतात जुन्या पाऊलखुणा परिसराच्या संशोधनाची गरज

जयंत जेनेकर

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील सिंगारपठार गावाच्या दक्षिण भागात माणिकगड पहाडाच्या डोंगररांगा आहे. याच डोंगररांगात एका डोंगरावर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गालगत पुरातन काळात ऐतिहासिक वास्तू उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ते काम आजही दगडी पाया बांधून अर्धवट स्थितीत पडलेले दिसते. त्यामुळे ही वास्तू नेमकी उभारण्यामागे निर्मितीकारांचा काय हेतू असावा व ही कोणत्या वास्तूची उभारणी असावी याचे इतिहासाच्या दृष्टीकोनातून संशोधन होणे आवश्यक आहे.

या डोंगरावर पायदळ चालत गेल्यास डोंगर मध्यात विस्तीर्ण चौरस आकाराची जागा आहे. तेथील जागेत चारही बाजूंनी पायव्याचे बांधकाम करण्यात आल्याच्या पाऊलखुणांचे दर्शन होते. त्यामुळे येथे वास्तु संरचना उभारणीचा प्रयत्न झालेला दिसून येतो.

डोंगराच्या अगदी उंच भागात असल्याने येथून दृष्टीपथास पडणारा निसर्ग नजाराही या ठिकाणावरून विलोभनीय दिसतो. चहूबाजूंनी हिरवेगार जंगल यामुळे स्वर्ग अनुभूती येथे आल्यानंतर प्राप्त होते. त्यास्थानी जाण्याच्या मार्गावर व वास्तू निर्माणाधिन स्थळावर आजही वास्तू निर्मितीसाठी वापरले जाणारे अनेक ताशी दगड विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. मात्र हे वास्तु निर्मिती कार्य कुठल्या काळात करण्यात आले. याबाबत कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील इतिहासावर संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पुरातत्व विभागाने यावर लक्ष पुरवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Historic place on the hills of Singar Plateau in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास