लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:03 PM2017-08-24T22:03:24+5:302017-08-24T22:03:38+5:30

शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे.

 History and Political Project on Lokmat | लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प

लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प

Next
ठळक मुद्देसामान्य ज्ञानात भर : शरदराव पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

आशिष देरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे.
‘लोकमत’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षाविषयक एक लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेमध्ये अर्थशास्त्र, इतिहास, सहकार, नागरीकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इंग्रजी अशा विविध विषयांवर आधारित माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. ही माहिती संकलित करण्याकरिता विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून त्यावर आधारित विविध विषयाचे प्रकल्प तयार करणे सुरू केले आहे.
दरवर्षी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयाचे प्रकल्प तयार करावे लागतात. त्याच प्रकल्पाचा भाग म्हणून आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता उपयुक्त असल्यामुळे प्राध्यापकांनी या लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सदर माहिती विशेष उपयोगात पडत आहे. त्यामुळे या उपक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विद्यार्थ्यांना दररोज स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता पुस्तके वाचण्यास सांगितल्यास विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वृत्तपत्र रोज विद्यार्थ्यांच्या हातात पडतात आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे कात्रण करून विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला लावल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. त्यामुळे वाचनाची सवय लागते. ‘लोकमत’ने सुरू केलेली मालिका स्तुत्य असून विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणारी आहे.
- प्रा. डॉ. शरद बेलोरकर

‘लोकमत’च्या लेखमालेत आलेले कात्रण रोज विद्यार्थी कापून ते पेपरवर चिकटवत आहेत. त्या माध्यमातून वृत्तपत्र वाचनाच्या आवडी सोबतच नवनवीन ज्ञान मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश मिळत आहे. लोकमतची लेखमाला विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार असून या उपक्रमामुळे युवकांच्या ज्ञानवाढीस चालना मिळत आहे.
- प्रा. डॉ. संजय गोरे, गडचांदूर

रोज काहीतरी नवीन शिकायला मिळत असल्यामुळे आम्ही लोकमत वृत्तपत्र वाचायला लागलो आहे. लोकमतच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मदत होत आहे. या लेखमालेमुळे वृत्तपत्र वाचनाची आवड देखील वृद्धिंगत झाली आहे.
- शितल झुरमुरे, विद्यार्थिनी.

Web Title:  History and Political Project on Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.