कोरोनाच्या सावटात जिल्ह्यात पोळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:26+5:302021-09-07T04:34:26+5:30
चंद्रपूर : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी पोळा साजरा केला जातो. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ...
चंद्रपूर : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी पोळा साजरा केला जातो. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे निर्बंध असल्याने गावागावात पोळा सणाच्या उत्सवावर विरजण पडले. दरम्यान, काही गावांमध्ये प्रशासनाचे आदेश झुगारून शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राज्याची मिरवणूक काढत
पोळा सण साजरा केला.
मागील वर्षी कोरोना सावटामुळे पोळा सणाच्या उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. शेतकऱ्यांनीही नियमांचे पालन करीत पोळा भरविलाच नाही. दरम्यान, सद्यास्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पोळा भरविण्याला परवानगी मिळतील, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र पोळा भरविण्यासाठी परवानगी नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही गावात नियम झुगारून पोळा भरविण्यात आला. मात्र या पोळ्यामध्ये दरवर्षीसारखा उत्साह बघायला मिळाला नाही. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाने गावागावांमध्ये बंदोबस्त ठेवला होता.
बाॅक्स
मिरवणूक निघालीच नाही
दरवर्षी गावातून वाजत-गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. यावर्षी मात्र काही गावातील शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करीत कृतज्ञता व्यक्त केली. तर काही गावात मिरवणूक काढत उत्साह साजरा केला.
बाॅक्स
पोलीस बंदोबस्त
गावातून मिरवणूक तसेच पोळा भरविण्यावर निर्बंध होते. असे असले तरी गावातील शांतता तसेच सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने गावागावात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बाॅक्स
पोळानिर्मित्त बैलांना सजविल्या जाते. निर्बंधामुळे यावर्षी काही शेतकऱ्यांनी बैलांना न सजविताच घरीच पूजाअर्चना करीत आपली कृतज्ञता व्यक्त केली.