भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 02:59 PM2022-04-26T14:59:44+5:302022-04-26T18:27:35+5:30
भारनियमन लवकर बंद करा, विजेची दरवाढ रोका, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सिंदेवाही (चंद्रपूर) : राज्यातील वीजटंचाई, वीज दरवाढ, भारनियमन अशा अनेक समस्यांना घेऊन सिंदेवाही तालुका भाजपच्या वतीने दसरा चौक परिसरात कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज बिलांची होळीसुद्धा करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विजेची टंचाई निर्माण झाली आहे. भारनियमन सुरू झाले आहे. विजेची मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. दिवसा-रात्रीमध्ये आठ ते दहा तास वीज गायब असते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाविकास आघाडी याकडे लक्ष न देता फक्त केंद्र सरकारवर खापर फोडण्याचे काम करत आहे, असा आरोप करीत भारनियमन लवकर बंद करा, विजेची दरवाढ रोका, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात नगरपंचायत माजी उपाध्यक्ष हितेशजी सूचक, आशिष चिंतलवार, रणधीर दुपारे, अरविंद देवतळे, जावेद पठाण, देवा मंडलवार, अमोल कुचनवार, राकेश सहारे, प्रीतम नागोसे, राकेश मारशेट्टीवार, नितीन खोब्रागडे, भाष्कर गायकवाड, अशोक सूर्यवंशी, दुर्वास मंडलवार, प्रतीक जैस्वाल गणेश गंडाइत, शाम गंडाइत व कार्यकर्ते सहभागी झाले होते.