मॅकरून स्टुडंट ॲकॅडमीतर्फे घर घर शिक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:08+5:302021-09-13T04:26:08+5:30
फोटो भद्रावती : कोविडच्या प्रादुर्भावामुळे आजही शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. परंतु विद्यालयातील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ ...
फोटो
भद्रावती : कोविडच्या प्रादुर्भावामुळे आजही शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. परंतु विद्यालयातील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मॅकरून स्टुडंट ॲकॅडमी भद्रावती येथील शिक्षक घर घर शिक्षण या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अध्यापन व मार्गदर्शन करीत आहे.
मॅकरून स्टुडंट ॲकॅडमीद्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पीयूष आंबटकर यांच्या संकल्पनेतून तसेच उपप्राचार्य राजदा सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनात घर घर शिक्षण मोहीम राबविण्यात येत असून शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.
ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची भ्रमणध्वनी घेण्याची परिस्थिती नाही. तसेच काहींकडे रिचार्ज करायलासुद्धा पैसे नाहीत. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच मॅकरून स्टुडंट ॲकॅडमी भद्रावतीतर्फे घर घर शिक्षण मोहीम राबविण्यात येत असून शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. मोहिमेअंतर्गत पालकांची परवानगी घेऊन, कोरोना नियमांचे पालन करून प्रत्येक घरी आठ ते दहा विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात आहे.
120921\img-20210912-wa0001.jpg
घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देताना शाळेतील शिक्षिका