पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:48 PM2019-05-27T22:48:04+5:302019-05-27T22:48:29+5:30

सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कंपनीचे नाव रेकॉर्डवर चढविले व जुन्या मालमत्ताधारकांचे नमूना आठमधे मालमत्तेचे वर्णन दर्शविले नाही.

The homes of the Piperbodians are named after Emta | पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर

पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून मांडली व्यथा : घर विकू शकत नाही, कर्जही घेऊ शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कंपनीचे नाव रेकॉर्डवर चढविले व जुन्या मालमत्ताधारकांचे नमूना आठमधे मालमत्तेचे वर्णन दर्शविले नाही. यामुळे पिपरबोडीवासींनी आपले राहते घर स्वमालकीचे आहे, हे कसे समजायचे, असा प्रश्न केला. गरज पडल्यास राहते घर विकूही शकत नाही व घरावर कर्जही घेऊ शकत नाही, अशी व्यथा पिपरबोडीवासीयांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.
कर्नाटक एम्टा कंपनीच्या प्रकल्पबाधीत क्षेत्रात येत असलेल्या चेकबरांज ग्रामपंचायत अंतर्गत जुनी पिपरबोडी व नवीन पिपरबोडी ही गावे आहेत. कर्नाटक एम्टा कंपनी आल्यानंतर तत्कालीन सचिवांनी चेकबंराज ग्रामपंचायत अंतर्गत पिपरबोडी गटग्रामपंचायतमधील सर्व्हे क्र. ८५/२, ८७/१, ८८/२, ८६/२(ब), मधील मालमत्तेच्या नमूना आठ अ मधे फेरफार करुन मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे वर्णन रेकॉर्डमधून काढून टाकले. यामध्ये तत्कालीन विशेष भू-अर्जन अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली. यामुळे पिपरबोडी येथील मुळ मालमत्ताधारकांची शासकीय रेकॉर्डवर मालमत्तेचे वर्णनसहीत नोंद झाली नाही. तसेच मालमत्ता मोजमापही झाले नाही. सन २०११ मध्ये कर्नाटक एम्टा कोल माईन्स कंपनीच्या नावे फेरफार करण्यात आला. यामधे जवळपास २७६ मालमत्तांचा समावेश असल्याचे पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी सांगितले. ज्या घरात पिपरबोडीवासी आज राहत आहेत, ती त्यांच्या नावावरच नाही.
ग्रामस्थांचे नुकसान
या प्रकरणात प्लॉटधारकांना मालमत्तेचा कुठलाही मोबदला न देता, कर्नाटक एम्टा कंपनीच्या नावे फेरफार झाल्याने मालमत्ताधारकांचे नुकसान झाले आहे. उलटपक्षी पिपरबोडीवासी मात्र राहत्या घरांचा कर ग्रामपंचायतीमध्ये भरत आहेत. या सर्व प्रकारामुळे पिपरबोडीवासी अधांतरी झालेले आहेत.
अन्यथा आंदोलन
हा सर्व नमूना आठ मध्ये झालेला घोळ चेकबरांज ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसचिव एम.एस. येवले यांच्या कारकिर्दीत झाला, त्यामुळे या प्रकाराला येवले कारणीभूत आहेत. चौकशी करून दोषीवर कारवाही करून आमचे घर आमच्या नावाने करण्यात यावे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शंकरय्या गुरय्या कॉलनीडी यांनी पत्रपरिषदेत दिला आहे पत्रकार परिषदेला गटग्रामपंचायतचे सदस्य शंकरय्या गुरय्या कॉलनीडी, प्रमोद नागोसे, संतोष कडेलवार, सोमय्या बोनगिरी, गोवर्धन यादव, कुमार रंगास्वामी, सूरज चाफले, आनंदराव सुका, शेखर दोरास्वामी, बाला मेडबलमी, श्रीनिवास बुक्का, सुरेखा कुमरे, अनुसयाबाई सातपुते, हितेंद्र मरसकोल्हे, गिरजाबाई पानघाटे, आदी नारायण कॉलनीडी, गोविंदा कुमरे व गावकरी उपस्थित होते.
३०० घरे बोगस
चेकबरांज ग्रामपंचायत अंतर्गत मानोरा वार्ड क्र.१ येथील मालमत्ता फेरफारमध्ये गाव नमूना आठच्या रेकॉर्डवर एकूण ९८३ घरे प्रमाणित केले. तत्कालीन सचिवांनी ९८३ घरांपैकी ३०० घरे मोक्यावर नाहीत, अशी नोंद केली. या ३०० घरांना न आढळलेली घरे म्हणून संबोधित केले. व ही ३०० घरे बोगस असूनही प्रमाणित केली. या बोगस घरांना कमी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. कारण या बोगस घरांची कर वसुली होत नसल्याने ग्रामपंचायत रेकॉर्डवर थकबाकी दाखवित आहे. करवसुली होत नसल्याने कर्मचाºयांचे आॅनलाईन पगार थकित होतात, याचा दबाव गावकºयांवर वाढत आहे. त्यामुळे गावातील भौतिक सुविधा बाधित होत आहे. करवसुली थकीत दाखविल्यामुळे गावातील शासकीय सुविधा पूर्ण करण्यास अडचण येत आहे, असेही गावकºयांनी यावेळी सांगितले.

Web Title: The homes of the Piperbodians are named after Emta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.