जिल्ह्यातील ३१ शेतकºयांना कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र देऊन सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:19 AM2017-10-19T00:19:51+5:302017-10-19T00:20:08+5:30
केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे आमचे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत जागरुकतेने काम करणारे सरकार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे आमचे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत जागरुकतेने काम करणारे सरकार आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार सारखी अभिनव योजना आणि महाकर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकºयांच्या केवळ आजच्या भल्याचाच नाही, तर भविष्याचा देखील विचार केला आहे. शाश्वत विकासावर राज्य व केंद्र सरकारचा भर असून याचे दृष्यपरिणाम लवकरच दिसून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
बुधवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील ३१ शेतकरी दाम्पत्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व दिवाळी निमित्त भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ऐन दिवाळीमध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकºयांना कर्जमाफी दिली जात असल्याचा आनंद आहे. यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे कौतूक करतो, अशा शब्दात शेतकºयांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर आ. अॅड.संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, खुशाल बोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर यांनी केंद्रातील व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील दोनही सरकार शेती, शेतकरी विकासाबद्दल आग्रही आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे गावागावात पाण्याची साठवण होत असून पाणी पातळी वाढण्यात मदत झाली आहे. कर्जमाफी सारखी घोषणा, बांधावर थेट खते पोहचविण्याची योजना असो, शेतकरी कायम विकासाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आतापर्यंत कोणत्याही शासनाने महाराष्ट्रामध्ये किटकनाशकाच्या प्रादूर्भावाने अपघात घडलेल्या, जीव गमवाव्या लागलेल्या शेतकºयांना मदत केली नाही. राज्यात आपण या दु:खात शेतकºयांच्या पाठीशी राहिलो व पहिल्यांदाच कोणत्या शासनाने यासाठी मदत केली. थेट २ लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यान्वित असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले. संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी मानले.
या शेतकºयांचा झाला सन्मान
कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात काही शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यात अशोक मोहुर्ले, ब्रह्मपुरी, कोरपना-अशोक मंगाम, राजूरा- राजया बेडकमवार, गोंडपिरी-अनिल चौधरी, भाऊजी ठुसे, भद्रावती-गणपती साव, प्रविण गेडाम, गजानन घोटकर, बल्लारपूर- पुंजाराम सोयाम, पोंभूर्णा- भाऊजी मडावी, सुनील लोणारे, दिलीप दिवसे, सावली-राजु मुप्पावार, शामराव मोहुर्ले, चिमूर-वासुदेव दोडके, विलास वाघाडे, मूल-रामप्रसाद गेडाम, सखाराम सिडाम, बोडकू मडावी, वरोरा-रविंद्र उरकुडे, अनंता घागी, चंद्रपूर-प्रभाकर पाचभाई, प्रकाश पारपल्लीवार, नागभीड-शांताबाई श्रीरामे, रघुनाथ कन्नाके, मंगेश गुरनुले, सिंदेवाही-आनंदराव लोखंडे व प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे.