कर्तुत्ववान महिलांचा आज सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:50 PM2017-12-09T23:50:37+5:302017-12-09T23:51:07+5:30
स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकमत सखी मंच व करण कोठारी ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकमत सखी सन्मान अवार्ड’चे रविवारी दि. १० डिसेंबर २०१७ ला आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, सिनेतारका प्रियंका ठाकूर (एक विवाह ऐसा भी, राजनिती फेम), गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार आदी उपस्थित राहतील.
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे. यावेळी लोकमत सखी सन्मान अवार्ड विविध क्षेत्रात विभागून देण्यात येईल. यात वैद्यकीय, सामाजिक शैक्षणिक, साहित्य व कला, क्रीडा, उद्योगक व व्यवसाय आणि शौर्य या क्षेत्राचा समावेश आहे. ज्या महिलांनी अवॉर्डकरिता प्रस्ताव पाठविले त्यांनी आपल्या परिवारासह आवर्जुन उपस्थित राहावे. प्रवेशिका कार्यालयातून प्राप्त करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर (९२७०१३१५८०) आणि जिल्हा सखी संयोजिका सोनम मडावी (९९७५६६६३५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे करण्यात आले आहे.