कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:51 PM2017-12-11T23:51:19+5:302017-12-11T23:51:45+5:30

Honorary of Ranuragi | कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान

कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ सखी सन्मान अवॉर्ड थाटात प्रदान : लोकमत आणि करण कोठारी ज्वेलर्सचा पुढाकार

चंद्रपूर : जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या रणरागिणींना ‘लोकमत’ व करण कोठारी ज्वेलर्सच्या वतीने रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘लोकमत सखी सन्मान अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्त्ते प्रदान करण्यात आला. संघर्ष, धडाडी आणि लोकाभिमुख कार्याचा हा दिमाखदार सोहळा बघून उपस्थितांची मने कृतज्ञ झालीत़ जीवनातील अनंत संकटांशी झुंजणारी ही ऊर्जा आणि प्रेरणा शेकडो सुहृदयांच्या मनात कायम राहणार आहे़
लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मार्लापण करून यासोहळ्याचा शुभारंभ झाला़ याप्रसंगी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वड्डेटीवार, महापौर अंजली घोटेकर, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार, करण कोठारी ज्वेलर्सच्या संचालिका सीमा कोठारी, सिनेतारिका प्रियंका ठाकूर, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, अक्षता फॅ शन मॉलचे संचालक राजीव उपगन्लावार, डॉ. नरेंद्र कोलते, कुल क्लबचे संचालक हरीश मोटवाणी, लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जितेंद्र चोरडिया, रमन बोथरा, संजय बोढे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील आठ कर्तृत्ववान रणरागिणींना उपस्थित मान्यवरांनी लोकमत सखी अवॉर्ड सन्मान प्रदान केला़ लोकमत वृत्तपत्र समूहाने सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक उपक्रम सुरू केले आहेत़ यामुळे विविध क्षेत्रातील व्यक्तींना कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळाली. हा सोहळा महिला शक्तीचा गौरव आहे, अशा शब्दात आ. वडेट्टीवार या सोहळ्याचे कौतुक केले. फॅशन शो व नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. निखिल असवानी, सानिका सोवानी, मयुरी झोरे, सिमरण ललवानी, नुतन कोलावार, ऐश्वर्या खोब्रागडे, मुस्कान शेख, नेहा तंबस्कर, प्रतिभा मोगरकर, समृद्ध हडगे, शीतल बोरकर, रचना तिवारी, अर्मन कौर, भाग्यश्री रोहारकर, विनोद पठाण, झिनत पठाण, सुनीता पल्लाडे आदींचा सहभाग होता. नृत्यकलेत पवन पंधरे, प्राजक्ता उपरकर, नटराज डॉन्स इन्स्टिट्युटच्या कलावंत सहभागी होते. पवन धुमाळे यांनी रेखाटलेली लक्षवेधक ठरली. लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी प्रस्ताविक केले. संचालन वर्षा कोल्हे-जवळे व अमोल कडुकर, आभार लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व वाचक उपस्थि होते़ लोकमत सखी मंच सदस्य व युवा नेक्स्ट सदस्यांनी सहकार्य केले.
फॅ शन, नृत्याने रंग भरला
महिलाशक्तीचा गौरव करतानाच फ ॅशन शो आणि नृत्यकलेने रसिकांची मने जिंकली़ पवन पंधरे यांनी सादर केलेल्या लावणीच्या अदाकारीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले़ कला सादर करणाऱ्या सर्व कलावंतांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला़
वडेट्टीवारांकडून ‘किलबिल’ला ५१ हजारांची मदत
प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्या ’लोकमत’ च्या जीवनगौरव पुरस्कार विजेत्या प्रा. प्रभावती मुठाळ यांच्या ’किलबिल’ संस्थेला आ़ विजय वडेट्टीवार यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. संजय बोढे यांनी ५ हजार रुपयांची मदत केली. प्रा़ मुठाळ म्हणाल्या, निराधार बालकांचे मी पालकत्व स्वीकारले़ समाजानेही ही भावना जोपासून उपेक्षितांना प्रेम दिले पाहिजे़
अल्का जेऊरकर : शैक्षणिक
ेसामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून आहेत. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. याशिवाय महिला व युवतींसाठी विविध उपक्रम सुरू करुन विकासाची संधी मिळवून दिली. जि.प. शाळेत आदर्श मुख्याध्यापक म्हणून कार्याचा ठसा उमटविला आहे़
मेघना शिंगरू : उद्योग व व्यवसाय
उद्योग व व्यवसाय क्षेत्रात धडाडीने कार्य करीत आहेत. आॅटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व असताना स्वबळावर व्यवसाय वाढविला़ महिलांनी उद्योगाच्या क्षेत्रात यावे, यासाठी सतत प्रोत्साहन देत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात, ही मांडणी सातत्याने करीत आहेत़
नुतन धवणे : कला व साहित्य
चंद्रपूरचे कला व साहित्यवैभव संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. शेकडो नाटकांमध्ये अभिनय करुन कलावंत म्हणून ओळख निर्माण केली. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातही ज्ञान व संस्कार रुजविण्यासाठी धडपडत आहेत. कथा व कविता लेखनातून समाजाचे प्रश्न मांडत आहेत़
शकुंतलादेवी बांठिया : सामाजिक
भारतीय जैन संघटना व श्री शांती सेवा मंडळाद्वारे सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी आरोग्य शिबिर सुरू केले. सामाजिक उपक्रमांतून वंचितांच्या समस्या सोडविण्यात मोलाचे कार्य करतात़ शेकडो दिव्यांग बालकांसाठी जयपूर फूट मोफत वाटप केले. समाजसेवेचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस व्यापक करीत आहेत़
इंदिरा गिलबिले : क्रीडा
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वाच्या जोरावर बुद्धीबळपटू म्हणून देशभरात ओळख निर्माण केली. अथेंस येथे पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. दिव्यांग म्हणून दु:ख कुरवाळत न बसता आत्मविश्वासांने क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत़ दिल्ली येथे नोकरी करतात़
डॉ. प्रेरणा कोलते : वैद्यकीय
स्त्रीभ्रृणहत्या विरोधी प्रबोधन करण्यासाठी मूलभूत कार्य करीत आहेत. समविचारी मैत्रिणीच्या सहकाºयांने गरीब विद्यार्थिंनींच्या विकासासाठी शिक्षण मंगल सुकन्या योजना सुरु केली. दुर्बल घटकांना आर्थिक मदत करण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळा- महाविद्यालयात आरोग्य जागृतीचे शिबिर राबवितात़
अभिलाषा सोनटक्के : शौर्य
घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही उच्च शिक्षण घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नोकरी मिळविली. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करीत आहेत. शासकीय वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास त्यांनी विशेष पुढाकार घेतला. वाघांच्या शिकारीला आळा घातला.

Web Title: Honorary of Ranuragi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.