आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:26+5:302021-06-27T04:19:26+5:30
ब्रह्मपुरी : १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसार माध्यमे तथा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य ...
ब्रह्मपुरी : १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसार माध्यमे तथा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्पाप सत्याग्रही व्यक्तींना तुरुंगात डांबण्यात आले. यातील कित्येकांनी १९ महिन्यापर्यंत तुरुंगवास भोगला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास झाला. या दिवसाच्या निमित्ताने हुकूमशाहीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी, ब्रह्मपुरीतर्फे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरी शहरातील स्व. भास्कर भुसारी, स्व. नानासाहेब जोशी, स्व. बाबूराव लांबे, स्व. अण्णा लांबे, स्व. नामदेव सालोटकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. सोबतच वामन भुसारी, दिलीप शिनखेडे व यशवंत नानोटी यांच्या घरी जाऊन शाल, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा महामंत्री व जि. प. सदस्य कृष्णा सहारे, नगर महामंत्री व नगरसेवक मनोज वठे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. संजय लांबे, प्रा. अशोक सालोटकर, दिलीप पंडित, श्रीकांत लांबे, सुरेश बनपूरकर उपस्थित होते.
===Photopath===
260621\img-20210626-wa0102.jpg
===Caption===
स्वातंत्र्य संग्राम च्या परिवाराना गौरविण्यात आले