ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:47 PM2017-11-30T23:47:33+5:302017-11-30T23:47:46+5:30

कधीकाळी ग्रामीण भागात रानमेवा म्हणून ज्ञात असलेली हुरडा पार्टी ज्वारीचा पेरा घटल्याने कालबाह्य झाली आहे.

Hoora party due to the reduction of jowar has expired | ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य

ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाच्या प्रोत्साहनाची गरज : बदलती शेती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती (आयुधनिर्माणी) : कधीकाळी ग्रामीण भागात रानमेवा म्हणून ज्ञात असलेली हुरडा पार्टी ज्वारीचा पेरा घटल्याने कालबाह्य झाली आहे.
शेतकºयांच्या आप्तस्वकीयांसह नातेवाईकांना हिवाळा सुरु झाल्यानंतर गुलाबी व कुडकुडणाºया थंडीत शेतात पेटत्या शेकोटीजवळ बसून ज्वारीच्या कणसांना भाजून खाण्याची मजा आनंददायीच असायची. परंतु अलिकडे शेतातील बदलत्या पीक पद्धतीने हुरडा पार्टी कालबाह्य झाल्याने शेतकरी परिवाराला मायेच्या धाग्यात गुंफणारा धागाच तुटला आहे.
दशकापूर्वी ग्रामीण भागात सर्वत्र ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे शेतशिवार ज्वारीच्या धांड्यानी बहरलेले दिसायचा. पूर्वी हिवाळा आला रे आला की, सर्वत्र हुरडा पार्टीची रेलचेल असायची. या निमित्ताने शहरात असलेले कास्तकारांचे नातेवाईक हुरडा खाण्यासाठी खास गावाकडे वळायचे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात स्नेहबंध वृद्धींगत व्हायचे. परंतु अलिकडे कापूस व सोयाबिन सारख्या नगदी पिकांचे उत्पादन वाढल्याने शेतकरी ज्वारी लावण्याकडे दुर्लक्ष करीत
आहे. रोही, रानडुकरे व रानटी पशु तथा पक्षांवर अंकुश ठेवणे कठीण झाल्याने शेतकºयांनी ज्वारी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. अनेक भागात केवळ जनावरांना चारा म्हणून कडबा मिळावा यासाठीच ज्वारी पेरतात. त्यामुळे ज्वारीची हुरडा पार्टी थंडबस्त्यात पडल्याने खवय्यांना या निमित्ताने खेड्यात हुरडा पार्टीत मिळणाºया वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, तिळाची चटणी, दह्याची चटणी अशा पकवानांना वंचित व्हावे लागत आहे. कधीकाळी सामान्य शेतकºयांच्या स्वत:च्या कुटुंब ऐक्यात व आप्तांच्या मनोमिलनात इतकेच नव्हे, तर राजकीय घडामोडीतही मोठी भूमिका बजावणारी हुरडा पार्टी शासनाच्या बदलत्या शेतीधोरणामुळे कालबाह्य झाली आहे.

Web Title: Hoora party due to the reduction of jowar has expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.