घोडाझरी सांडव्याखालचे दगड पर्यटकांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:38 AM2019-08-11T00:38:01+5:302019-08-11T00:38:53+5:30
घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. तलाव ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. सांडव्यावरून फेसाळत पडणाऱ्या पाण्यात पर्यटक मनसोक्त डुंबतात. मात्र नेमक्या याच जागी हे दगड मोठ्या प्रमाणावर विखुरले आहेत. हे दगड पर्यटकांना जीवेघेणे ठरत आहेत. पाच वर्षांत घोडाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोने हुलकावणी दिली होती. या दगडांकडे संबंधितविभागाने लक्ष गेले नाही. यंदा प्रथमच हा तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या परिसरात पाऊस पडल्यास ओव्हरफ्लो होण्याला केवळ एक फुट अंतर शिल्लक आहे. खरीप शेतीचा हंगाम सुरू असला तरी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही. त्यामुळे घोडाझरी तलाव कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकतो. ओव्हरफ्लो झाला नाही तरी पर्यटक दररोज सांडव्यावर येत आहेत. जिल्हाबाहेरील पर्यटकही कुटुंबासह घोडाझरी तलावावर येऊ लागले आहेत. काही दिवसात ओव्हरफ्लो होताच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंचन विभागाने धोका दगड तातडीने उचलावे, अशी पर्यटकांची मागणी आहे.