घोडा रथयात्रेत भक्तांचा सागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:45 PM2019-02-17T22:45:14+5:302019-02-17T22:45:32+5:30
घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्यापारपेठ सजली आहे. रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्यदिव्य लाकडी घोडा व रथ यावर श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असल्याने क्रांतीनगरीत भक्ताचा सागर उसळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्यापारपेठ सजली आहे. रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्यदिव्य लाकडी घोडा व रथ यावर श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असल्याने क्रांतीनगरीत भक्ताचा सागर उसळला आहे.
या घोडा रथ यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. २० फेब्रुवारीला गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीहरी बालाजी मंदिरच्या प्रांगणात आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या माध्यमातून दरवर्षी उत्सवात वेगवेगळया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती उभारल्या जाते.
यंदा गुजरात येथील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून ते यावर्षीचे आकर्षण ठरले आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज देवस्थानात मागील ३९२ वर्षांपासून दरवर्षी घोडा रथयात्रा उत्सव साजरा करण्यात येत आहे. १० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात विनोदबुवा खोड महाराज यांचे नारदेय कीर्तन होत आहे. या घोडारथ यात्रेसाठी गावागावातून भाविक चिमुरात दाखल झाले आहेत.