तप्त उन्हात आदिवासी विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:50 AM2019-05-07T00:50:54+5:302019-05-07T00:51:07+5:30

राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला.

In the hot sun tribal students went to the district collector | तप्त उन्हात आदिवासी विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

तप्त उन्हात आदिवासी विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

googlenewsNext
ठळक मुद्देराजुरा अत्याचार प्रकरण : आरोपींना फाशीची शिक्षा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. अंगाची लाही लाही करणाऱ्या ऊन्हातही मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
अशा आहेत मागण्या
या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आदिवासी समजाबद्दल बेताल वक्तव्य करणाºया नेत्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्यात यावी. आरोपीची नार्को टेस्ट चाचणी करण्यात यावी.फास्ट टॅÑक न्यायालयात केस दाखल करून सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा. आदिवासी प्रकल्प कार्यालयातील हजलगर्जीपणा करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून प्रकल्प अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अत्याचार पीडित मुलींची शासनातर्फे पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रत्येक पीषित मुलींना शासकीय नोकरी तसेच प्रत्येकी २५ लाख रूपये देण्यात यावे. राज्यातील सर्व खासगी, सरकारी, नामांकित शाळा, आश्रमशाळा येथील मुलींच्या वसतिगृहाची चौकशी करून अशा प्रकारचे प्रकरण पुन्हा होवू नये, यासाठी शासनाकडून सर्वकष धोरण ठरविण्यात यावे. शासकीय वसतिगृहातील डीबीटी योजना बंद करण्यात यावी. महाराष्टÑात सर्व आश्रमशाळा बंद करून तालुका, जिल्हास्तरावर निवासी शाळांची स्थापना करण्यात यावी.

Web Title: In the hot sun tribal students went to the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.