हाॅटेल बंद करून दारोदार भाजीपाला विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:29 AM2021-04-22T04:29:07+5:302021-04-22T04:29:07+5:30
पाटण : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज नियमावली जाहीर केली असून, ...
पाटण : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज नियमावली जाहीर केली असून, किराणा व भाजीपाला विक्रीला बंधने लावत दारोदार विक्री करण्यासाठी निर्देश दिले. पाटण येथील हॉटेल व्यावसायिक लाॅकडाऊन लागल्यापासून हाॅटेल बंद पडल्याने येथील दत्ता शेटकर या तरुणाने कारने दारोदार भाजीपाला विक्री सुरू केली आहे.
लाॅकडाऊनमुळे बहुतांश उद्योगावर विपरीत, तर ठरावीक व्यवसायावर चांगले परिणाम झाले. या सर्व परिणामामुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हरविले. जगण्यासाठी नव्या व्यवसायाचा वाटा शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेकांनी जुने धंदे बंद करून कोरोना काळात नवे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच पद्धतीने जिवती तालुक्यातील अनेक तरुण भाजी मंडईचा व्यवसायाकडे वळले आहे. अचानक सुरू केलेला भाजी विक्रीचा व्यवसायच आज उदरनिर्वाहचे साधन बनला आहे.
कोट
संध्या कोरोना काळात हाॅटेल व्यवसायाला बंदी आहे. उत्पनाचे साधन बंद पडले आहे. घरात बसून संसाराचा गाडा कसा चालवायचा, त्यामुळे मी हाॅटेल बंद करून स्वत:च्या कारने भाजीपाला विक्री सुरू केली आहे.
- दत्ता भागवत शेटकर, व्यावसायिक, पाटण.