घरकुलासाठी जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:11 PM2018-10-30T23:11:00+5:302018-10-30T23:11:45+5:30

घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

The house collapsed to the ground floor | घरकुलासाठी जिल्हाकचेरीवर धडक

घरकुलासाठी जिल्हाकचेरीवर धडक

Next
ठळक मुद्देशेकडो लाभार्थ्यांचा सहभाग : घरकुलाचा तात्काळ लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
जैन भवनजवळून निघालेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी बोलताना किशोर जोरगेवार म्हणाले, अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी येथील नागरिकांची अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची क्षमता अद्याप लोप पावलेली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने द्या, अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला.
हक्काच घर मिळालेच पाहिजे, असा नारा बुलंद करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत तत्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले.
यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी आदींची उपस्थिती होती.
अशी केली थट्टा
घरकूल योजनेच्या नावावर शासनाने २१ हजार ७९५ हून अधिक नागरिकांडून अर्ज भरुन घेतले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. तर दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांना अद्याप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्यक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरीकडे असलेले घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे, असा आरोप किशोर जोरगेवार यांनी यावेळी केला.
या आहेत मागण्या
घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नझूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायीस्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

Web Title: The house collapsed to the ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.