भ्रष्टाचार निवारण समितीची सभा
By admin | Published: July 16, 2015 01:21 AM2015-07-16T01:21:00+5:302015-07-16T01:21:00+5:30
भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शासकीय विश्रामगृह नागपूर रोड चंद्रपूर येथे विस्तार आराखडा सभा घेण्यात आली.
चंद्रपूर : भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शासकीय विश्रामगृह नागपूर रोड चंद्रपूर येथे विस्तार आराखडा सभा घेण्यात आली.
सदर सभेमध्ये चंद्रपूर जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या भ्रष्टाचार निवारण समितीच्या माध्यमातून संपुर्ण जिल्हा समितीचा विस्तार करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण स्तरावर समितीच्या कार्यकरिणी तयार करणे, जिल्हाभर सभासद नोंदणी करणे, जनतेच्या समस्या जाणून घेणे व त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन सुहास गोगुलवार यांनी केले.
सदर सभेचे अध्यक्ष सुहास गोगुलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ संघटक विवेक बारसिंगे, जि. निरीक्षक किशोर महाजन, भरत गुप्ता, सतीन मिनगूलवार, स्वप्नील काशीकर, संजय कन्नावार, जॉन मेश्राम, कोटनाके, अॅड. बोरीकर, निलेश हिवराळे, जिल्हा महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, सुनिता टेंभरे, खाडीलकर, संगीता मगरदे, नरवाडे यांच्यासह समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समितीच्या विस्तारासोबतच गोरगरिबांच्या शाळकरी मुलांना नोटबुक्स वितरण करणे, रुग्णांना फळवाटप करण्याचा निर्णय झाला. (शहर प्रतिनिधी)