दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 03:31 PM2020-04-06T15:31:30+5:302020-04-06T15:32:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली.

The house was burnt with the lamp; Events in Chandrapur district | दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देजिवती तालुक्यात दोन घरे जळून राख


लोकमत न्यूज नेटर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. पाटण येथील कुंदन उईके व पल्लेझरी श्रीहरी वाघमारे यांना दिवे लावणे महागात पडले.
जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके यांनी रविवारी रात्री ९ वाजता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्या घरामध्ये लाईट बंद करून दिवे लावले. त्यानंतर उईके यांचे कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक दिव्यामुळे घराला आग लागली. काही वेळात ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रोख रक्कम १५ हजार रुपये, एक ते दीड क्विंटल तुरी, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा, जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाल्याची माहिती कुंदन देवराव उईके, विमल कुंदन उईके यांनी दिली. पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व बिट अमलदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

पल्लेझरीतील घरालाही आग
जिवती तालुक्यातीलच पल्लेझरी येथील श्रीहरी वाघमारे यांच्या घरालाही रविवारी लावलेल्या दिव्यामुळे आग लागली. श्रीहरी वाघमारे यांनी रविवारी रात्री कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही सारे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी रात्री ९ वाजता घरी दिवे लावले. मात्र याच दिव्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. गावकऱ्यांनी पाण्याने ही आग विझविली. मात्र आगीत वाघमारे यांचे मोठे नुकसान झाले.

Web Title: The house was burnt with the lamp; Events in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.