तांदळाची चोरी करून घराला आग लावली

By admin | Published: February 20, 2016 01:51 AM2016-02-20T01:51:22+5:302016-02-20T01:51:22+5:30

ऊर्जानगरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये चोरट्यांनी एका कुलूप बंद घरातील चार कट्टे तांदळाची चोरी करुन घराला आग लावून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

The house was set on fire by ransacking the rice | तांदळाची चोरी करून घराला आग लावली

तांदळाची चोरी करून घराला आग लावली

Next

दुर्गापूर: ऊर्जानगरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये चोरट्यांनी एका कुलूप बंद घरातील चार कट्टे तांदळाची चोरी करुन घराला आग लावून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यात घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ऊर्जानगरमधील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये वास्तव्याला असलेले घनश्याम रिठे हे घराल कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, संधीसाधू इसमाने गुरुवारी रात्री कुलूप तोडून आत ठेवलेल्या सहा कट्ट्यांपैकी चार कट्टे तांदळाची चोरी केली. त्यानंतर घराला आग लावली. रात्रभर घरात आग धगधगत होती. सकाळी घराला लागलेली आग लोकांच्या निदर्शनास आली. लगेच दुर्गापूर पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करुन आग विझविली. या आगीत घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. या कटकारस्थानामुळे घरमालकाचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. घनश्याम रिठे हे मोलमजुरी करुन व वेळप्रसंगी भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतात. या घटनेत अन्न, वस्त्र, निवारा जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी, दुर्गापूरचे ठाणेदार आर. के. सिंगनजुडे, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घरातील वस्तूंची चोरी करुन नंतरही आग लावल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)

Web Title: The house was set on fire by ransacking the rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.