२०२२ पर्यंत आदिवासी बांधवांना देणार हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:24 AM2019-08-11T00:24:36+5:302019-08-11T00:25:03+5:30

पर्यावरणाचे पयार्याने वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सात्विक, प्रामाणिक आदिवासी समाज बांधवांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण करत त्यांच्या जीवनात प्रकाशाचा, विकासाचा सूर्य आणण्याची नितांत आवश्यकता आहे.

Houses of entitlement to tribal brothers up to 5 | २०२२ पर्यंत आदिवासी बांधवांना देणार हक्काची घरे

२०२२ पर्यंत आदिवासी बांधवांना देणार हक्काची घरे

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । पोंभुर्णा येथे मूलनिवासी गौरवदिन समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पर्यावरणाचे पयार्याने वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सात्विक, प्रामाणिक आदिवासी समाज बांधवांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण करत त्यांच्या जीवनात प्रकाशाचा, विकासाचा सूर्य आणण्याची नितांत आवश्यकता आहे. २०२२ च्या ९ आॅगस्ट अर्थात आदिवासी दिनापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी बांधवाला त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करण्यात येईल. तसेच पोंभुर्णा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने सभागृहाचे बांधकाम करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
२०२४ मधील आॅलिम्पीक स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्यासाठी मिशन शक्तीच्या माध्यमातून तयारी सुरू झाली असून या स्पर्धेत पदक प्राप्त करणारा खेळाडू पदक स्वीकारताना जय सेवा अशी गर्जना करेल, याशिवाय येणाºया काळात जिल्ह्यातील आदिवासी तरूण, तरूणी आयएएस, आयपीएससारख्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आपण निश्चितपणे बघू अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूरच्या माध्यमातून आयोजित जागतिक मुलनिवासी गौरवदिन समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना महासभेचे प्रदेशाध्यक्ष मुरलीधर टेकाम, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, सुधाकर कन्नाके, भाऊसाहेब टेकाम, डॉ. प्रशांत पेंदाम, गोंडीयन विचारवंत योगेश कोडापे आदींची उपस्थिती होती.

रोजगार निर्मितीची क्षमता वाढविणार
आदिवासी विद्यार्ध्यांचे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी १०० विद्यार्थ्यांना मिशन मंथनच्या माध्यमातून आयआयटीसोबत सामंजस्य करार करून त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी रोजगार निमीर्तीची क्षमता घेवून इतरांना रोजगार देण्यासाठी सक्षम होणार आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. या भागात २५ लाख रू. किंमतीचे सहा गोटूलाचे बांधकाम आपण यापूर्वी मंजूर केले असून पोंभुर्णा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने मोठे सभागृह बांधण्यात येईल, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

कुक्कुटपालन संस्थेचा यशस्वी प्रवास
महिला बचतगटांना ट्रॅक्टरचे वाटप, सिलाई मशीनचे वाटप आपण केले आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची कुक्कुटपालन संस्था आपण स्थापन केली. या संस्थेचा यशस्वी प्रवास अभिमानास्पद आहे. अशा पध्दतीची कंपनी राज्यातील पहिला प्रयोग ठरली आहे. आदिवासी समाज बांधवांच्या हितासाठी, कल्याणासाठी राज्य सरकारचा मंत्री म्हणून मी व माझे सरकार कटिबध्द असून आदिवासींच्या हिताच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जागतिक आदिवासी दिवस हा फक्त कार्यक्रम साजरा करण्याचे निमित्त नसून पर्यावरणाचे रक्षण करणाºया आदिवासींच्या सन्मानाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Houses of entitlement to tribal brothers up to 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.