आपले महाकाली मंदिर कसे असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:51 PM2019-02-11T22:51:31+5:302019-02-11T22:51:54+5:30
चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महाकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तिर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महाकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तिर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तथापि, या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना, नव्या कल्पना ऐकण्यासाठी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ९ या वेळामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रियदर्शिनी सभागृहात विशेष कार्यक्रम होत आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यापेक्षा अतिशय आकर्षक व नयनरम्य विकास आराखडा महांकाली मंदिराचा तयार करण्यात आला आहे. या कामाला सुरुवात होण्यापूर्वी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या ऐतिहासिक मंदिराच्या विकासामध्ये आणखी काय सुधारणा करायच्या किंवा उपायोजना काय करायच्या, यासाठी १४ फेब्रुवारीला हे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात येईल.
सैनिकी शाळेच्या बांधकामाची करणार पाहणी
चंद्रपूर : बल्लारपूरनजिक विसापूर येथे उभी राहत असलेली चंद्रपूर सैनिकी शाळा पूर्णत्वास येत असून या सैनिकी शाळेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे १४ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. राज्याचे वित्त ,नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत ते या निमार्णाधीन वास्तूची पाहणी करणार आहेत. चंद्रपूर येथील सैनिकी शाळा ही भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा ठरावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पद्धतीच्या आराखड्यावर ही देखणी इमारत उभी राहत असून अद्यावत सुविधा दिल्या जाणार आहेत. या सैनिकी शाळेची दखल राष्ट्रीय स्तरावर नुकतीच लेफ्टनंट जनरल आर. आर. निंबोरकर यांच्या भेटीमुळे घेण्यात आली होती