लाकडाअभावी मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:04+5:302021-02-24T04:30:04+5:30
मूल येथे गेल्या अनेक महिन्यांपासून जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. नागरिकांनी जळाऊ लाकडाची मागणी केल्यानंतर वनविभागाचे पाचही ...
मूल येथे गेल्या अनेक महिन्यांपासून जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. नागरिकांनी जळाऊ लाकडाची मागणी केल्यानंतर वनविभागाचे पाचही कार्यालय आपापल्या जबाबदाऱ्या झटकत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता जळाऊ लाकडाच्या कटाईसाठी निधीच उपलब्ध झाला नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अंत्यविधीसाठी जळावू लाकडे अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती नगरसेवक विनोद कामडी यांनी दिली.
कोट
जळावू लाकडाच्या कटाईसाठी या वर्षात निधी उपलब्ध झाला नाही. तसेच सीमाकंनही करण्यात आले नाही. त्यामुळे जंगलातील लाकडे कापण्यात आली नाही. त्यामुळे डेपोमध्ये जळाऊ लाकडे उपलब्ध होऊ शकली नाही.
- वैभव राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली.