ऑनलाईन सेवांना सकारात्मक प्रतिसाद किती ? परिणामकारकता प्रथम तपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 11:28 PM2022-10-28T23:28:54+5:302022-10-28T23:32:31+5:30
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विवेक भिमनवार हे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज आणि रस्ता सुरक्षा विषय गुणात्मक कामगिरीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान सुलभ व पारदर्शक करण्याचे उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाइन झालेल्या आहेत. या सेवांचे लाभार्थी म्हणजे अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो वा नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विवेक भिमनवार हे गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज आणि रस्ता सुरक्षा विषय गुणात्मक कामगिरीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भेटीदरम्यान परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी गडचिरोली कार्यालयासाठी अद्यावत यंत्रणेसह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. हे दर वाहन विशेष केंद्रीय साहाय्य योजना या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांच्या कार्याची प्रशंसा केली. या प्रसंगी नागपूर शहर, ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाराचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे व वर्धाचे समीर शेख उपस्थित होते.
१४ सेवांचा अर्ज प्रलंबित राहू नये
- सेवा हमी कायद्यांतर्गत १४ सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही. याविषयीच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच मोटारवाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे यावरही त्यांनी कटाक्ष टाकला.
- विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी, असे निर्देशही परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आढावा बैठकीत दिले.