डेल्टा प्लसला कसे रोखणार, पहिला डोस घेणारे केवळ २५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:57+5:302021-07-03T04:18:57+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय राबविण्यात येत आहेत. कोरोनावर अद्यापही औषध निघाले नाही. परंतु, लसीकरण हे कोरोनावर प्रभावी ...

How to prevent Delta Plus, only 25% of those taking the first dose | डेल्टा प्लसला कसे रोखणार, पहिला डोस घेणारे केवळ २५ टक्के

डेल्टा प्लसला कसे रोखणार, पहिला डोस घेणारे केवळ २५ टक्के

googlenewsNext

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय राबविण्यात येत आहेत. कोरोनावर अद्यापही औषध निघाले नाही. परंतु, लसीकरण हे कोरोनावर प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. सुरुवातीच्या कालावधीत लसीची उपलब्धता कमी असल्याने धुमधडाक्यात सुरू केलेली लसीकरण केंद्र बंद करावी लागली. त्यातच बहुतांश ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने लसीकरण कमी होत आहे; तर काही ठिकाणात लसीकरणाने गती पकडली आहे. परंतु, अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. परंतु, राज्यात डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णांनी डोकेदुखी वाढवली आहे. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. मात्र लसीकरणाची आकडेवारी बघता धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

१८ ते ४४ वयोगटातील आठ हजार जणांचे दोन्ही डोस

१ जूनरोजी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र दहा दिवसातच हे लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर २५ जूनपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाचे नऊ लाख ६८ हजार ९४८ एवढे उद्दिष्ट आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत ५८ हजार १०३ जणांनी पहिला डोस घेतला आहे, तर नऊ लाख दहा हजार ८४५ जणांचा पहिला डोस अद्यापही शिल्लक आहे, तर आठ हजार ९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

-----

चंद्रपूर सर्वाधिक, तर जिवतीत कमी

चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत पहिला डोस ७० हजार ३१५, दुसरा २५ हजार ६०७, तर चंद्रपूर तालुक्यात २६ हजार ९९३ जणांनी पहिला, तर पाच हजार ६३६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याउलट जिवती तालुक्यात सर्वाधिक कमी लसीकरण झाले आहे. जिवती तालुक्यात पहिला डोस पाच हजार ८३१, तर चार हजार २३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण लसीकरण ४९१९७४

पहिला डोस ४०२६४९

दुसरा डोस ८९३२५

Web Title: How to prevent Delta Plus, only 25% of those taking the first dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.