मजुरांना बफरझोन क्षेत्रात पाठविलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:46+5:30

तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा  जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबरदस्तीने वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनासाठी पाठविणे हे बेकायदेशीर असून, महाराष्ट्र वनकायद्याचा उल्लंघन करणारी ही बाब आहे. 

How to send workers to buffer zone area? | मजुरांना बफरझोन क्षेत्रात पाठविलेच कसे?

मजुरांना बफरझोन क्षेत्रात पाठविलेच कसे?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मजुरांना तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी वनविभागाने व तेंदूपत्ता कंपनीने बफरझोन क्षेत्रात पाठविले. हे क्षेत्र संवेदनशील आहे. त्यामुळेच भादुर्णी येथील खुशाल सोनुले या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला असल्याचा आरोप करून तेंदूपत्ता कंपनीवर आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे केली आहे.
तेंदूपत्ता संकलनासाठी मे. प्रभात इंटरप्राईजेस रोलटोली गोंदिया या कंपनीच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनाचे काम दिले असल्यामुळे मजुरांना बफरझोन क्षेत्रात  पाठविल्या जात होते. तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा  जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबरदस्तीने वनविभागाच्या परवानगीने तेंदूपत्ता संकलनासाठी पाठविणे हे बेकायदेशीर असून, महाराष्ट्र वनकायद्याचा उल्लंघन करणारी ही बाब आहे. 
वनविभागाच्या कायद्यांनासुद्धा धाब्यावर बसवून राजरोसपणे हजारो मजुरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मे. प्रभात इंटरप्राईजेस रोलटोली गोंदिया व वनपरिक्षेत्र अधिकारी मूल हे दोषी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून मूलचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी  पं. स. च्या माजी सदस्य वर्षा लोनबले, अखिल भारतीय माळी महासंघ मूलचे ईश्वर लोनबले, नंदू बारस्कर, ओमदेव मोहुर्ले, गोपाळा सोनुले, मृतकाची पत्नी ज्योस्ना सोनुले,   हेमंत सोनुले, आदी उपस्थित होते.

 

Web Title: How to send workers to buffer zone area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.