- तर मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा संपेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:55 PM2019-01-15T22:55:12+5:302019-01-15T22:55:59+5:30
वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू आहे.
वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू आहे. नागरिकांनी वन्यजीवांवरील प्रेमासाठी वनांवरील आत्मनिर्भरता कमी करून विविध योजनांच्या आधारे स्वावलंबी झाल्यास हा संघर्ष कायमचा संपू शकतो. यातून मानवी जीवनामध्ये सकारात्मक बदल घडेल. ‘जगा आणि जगू द्या’ या वैश्विक संस्कृतीला चालना मिळेल, असा आशावाद विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांनी मकरसंक्रातीनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर मोठा आघात होतो. शासनाने अशा कुटुंबांना १५ लाखांची मदत देत आहे. पण जीवाची मोल पैशात मोजता येत नाही. नागरिकांनी सतर्कता जोपासल्यास ही समस्याच उद्भवणार नाही. वन्यजिवांनी सहजीवनाचे तत्व स्वीकारले. वन्यजिवांकडे माणुसकीच्या दृष्टीने बघतानाच त्यांच्या सहजीवनाला बाधा येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यातून निसर्ग टिकेल, माणूस आनंदी राहील, असे मत विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांनी व्यक्त केले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याला आंतराष्टÑीय कीर्ती मिळाली. हे वैभव वन्य प्राण्यांमुळेच शक्य होऊ शकले, याकरिता वन परिसरातील नागरिकांची निसर्गाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टीही महत्त्वाची ठरली आहे.