मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; ताडोबातील पाच वाघ नेणार नवेगाव-नागझिराला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:36 AM2023-03-06T10:36:44+5:302023-03-06T10:37:49+5:30

उदंड झाली संख्या; स्थलांतरणाची सर्व प्रक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार

Human-wildlife conflict intensified; Five tigers from Tadoba will be taken to Navegaon-Nagzira | मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; ताडोबातील पाच वाघ नेणार नवेगाव-नागझिराला

मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; ताडोबातील पाच वाघ नेणार नवेगाव-नागझिराला

googlenewsNext

चंद्रपूर : एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या २०३ पर्यंत पोहोचल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वाघांच्या मृत्यूच्या घटनांतही वाढ झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पाच वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जातील, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिली. सावली तालुक्यातील पेंढारी मक्ता येथील मत्स्य महोत्सवात ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. दिवसागणिक वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचे जीव जात आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना आवश्यक होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे अधिवास क्षेत्र कमी पडत असल्याने दोन वाघांच्या झुंजीत वाघाचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून पाच वाघ पहिल्यांदा गोंदियातील नवेगाव- बांध, नागझिरा अभयारण्यात स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

दोन टप्प्यांत स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे दोन टप्प्यांत स्थलांतरण करण्यात येणार आहे. स्थलांतरणाची सर्व प्रक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार होईल. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट व संभाजीनगर या तीन ठिकाणी २५ वाघ स्थलांतरित केले जातील. वाघांच्या स्थलांतरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमधील ग्रामस्थ भयमुक्त होतील आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत मिळेल, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.

Web Title: Human-wildlife conflict intensified; Five tigers from Tadoba will be taken to Navegaon-Nagzira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.