Chandrapur | वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार; नागरिकांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 12:11 PM2022-10-20T12:11:49+5:302022-10-20T12:23:59+5:30

मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना

Human-Wildlife Conflict : Two Cowherds Killed Tiger Attack in chandrapur dist | Chandrapur | वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार; नागरिकांत दहशत

Chandrapur | वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार; नागरिकांत दहशत

Next

मूल (चंद्रपूर) : दबा धरून बसलेल्या वाघाने दाेन गुराख्यांचा जीव घेतला. ही घटना मूल तालुक्यातील कवळपेठ कक्ष क्रमांक ७५१ येथे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. एकापाठोपाठ दाेघांवर हल्ला करून ठार केल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नानाजी सुकरू निकेसर (६०) व ढिवरू वासेकर (६१, दोघेही रा. चिचाळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चिचाळा व कवळपेठ या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात वनविभाग नेहमी लक्ष ठेवून असतो. बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान नानाजी सुकरू निकेसर व ढिवरू वासेकर हे दोघे गुराखी जनावरे चारण्यासाठी कवळपेठ कक्ष क्रमांक ७५१ मध्ये गेले होते. गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने एकावर हल्ला केला. त्यावेळी दुसऱ्या गुराख्याने सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरही वाघाने हल्ला करून ठार केले.

या हल्ल्यात एकाच्या शरीराचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. आजपर्यंत वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. मात्र, एकाच वेळी दोघांवर हल्ला करून ठार केल्याची घटना प्रथमच घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे चिचाळा गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन विशेष लक्ष घालत आहे.

Web Title: Human-Wildlife Conflict : Two Cowherds Killed Tiger Attack in chandrapur dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.