मानवाने समाजातील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्नरत असावे!

By admin | Published: February 6, 2017 12:45 AM2017-02-06T00:45:05+5:302017-02-06T00:45:05+5:30

महिलांच्या विकासावरच आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे. महिला स्वबळावर ध्येय गाठत आहेत. त्यांचा स्वप्नातील जग त्यांना दिसू लागले आहे.

Humans should be working for the development of the citizens of the society! | मानवाने समाजातील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्नरत असावे!

मानवाने समाजातील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्नरत असावे!

Next

सुधीर मुनगंटीवार याचे प्रतिपादन : खेळ-खुद कार्यक्रमाचे उद्घाटन
आवाळपूर : महिलांच्या विकासावरच आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे. महिला स्वबळावर ध्येय गाठत आहेत. त्यांचा स्वप्नातील जग त्यांना दिसू लागले आहे. त्यामुळेच त्यांनी पुढाकार घेऊन दारुबंदी करण्याची मागणी केली. आज मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला गती मिळत आहे. तसेचत त्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. आमचे सरकार महिलांचा उद्धारासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच महिला सक्षमिकरणास व्हाव दिला जात आहे. त्यामुळेच महिलांची विकास वृत्ती वाढेल. अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाऊडेंशन करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. स्वत:साठी जगणे हि मानवाची प्रवृत्ती आहे. परंतु दुसर्यासाठी जगणे हिच, मानवाची खरी प्रवृती आहे. स्वत:साठी जगणे हे जगणे नसून दुसर्यांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाऊडेंशनद्वारा आयोजित खेळ-खुद कार्यक्रम २०१७ च्या उदघाटनिय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पिल्लई, प्रमुख पाहुणे म्हणून अलोक निगम, आनंद लोहिया, गणेश जयवेल्लू, बालासुब्रम्हण्यम, वेलफेअर फाउंडेंनचे उपमुख्यप्रबंधक मेजर आशिष पासबोला आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, वेलफेअर फाऊडेंशन स्वत:च्या विकासासोबत इतरही १० गावचा विकास करीत आहे. त्याबरोबरच आमच्या सरकारकडूनही गावचा, व तेथील महिलांचा विकासासाठी कटीबद्ध आहे. भविष्यात हि गावे देशातील स्वच्छ सुंदर गावं, म्हणून पुढे यावी, आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमात सदर गावाचा गाजाबाजा व्हावा, यासाठी सर्व गावकऱ्यांनी गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. असे ते म्हणाले.
यावेळी आमदार संजय धोटे म्हणाले, ग्रामीण भागाचा आणि तेथील नागरिकांचा विकास करणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे खेडे गावाना जोडण्यासाठी दळणवळणाच्या सोयीकरिता वेगळी तरतूद करून पांदन रस्तासाठी वेगळा निधी मंजूर करून काम करण्यात येत आहे. हे सर्व कार्य पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याच्याच पुढाकारातून करण्यात येत आहेत. जाते. त्यांनी चंद्रपूर जिल्हातील दारू बंद करून एक उल्लेखन्नीय कार्य केले आहे. व्यासन मुक्तीचा ध्यास आम्हीसुद्धा पत्करला आहे. व्यसनापासून पुरुषाने व महिलाने दूर असले पाहिजे. व्यसनामुळे मानवाच्या विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे प्रत्यकाने व्यासनांपासून दूर असले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी खेळ कुद कार्यक्रमात सहभागी दहा गावांनी स्त्रिभृण हत्या, स्वच्छ गाव, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, सैनिकांचा सन्मान या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्याक्रमाचे संचालन सोनाली गावारगुर, तर आभार संजय पेठकर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Humans should be working for the development of the citizens of the society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.