शेकडो लाभधारक शिधा पुस्तिकेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:01+5:302021-07-31T04:28:01+5:30
चिमूर तालुक्यातील विविध जनतेने शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर केलेला आहे. प्रामुख्याने फाटलेल्या शिधापत्रिका बदलून देण्यासाठी, संयुक्त कुटुंबातून विभक्त कुटुंब करण्यासाठी, ...
चिमूर तालुक्यातील विविध जनतेने शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर केलेला आहे. प्रामुख्याने फाटलेल्या शिधापत्रिका बदलून देण्यासाठी, संयुक्त कुटुंबातून विभक्त कुटुंब करण्यासाठी, तसेच नव्याने शिधा पुस्तिका मिळावी, यासाठी मार्च महिन्यापासून अर्ज दाखल केलेले आहेत. या सर्वांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज व सर्व कागदपत्र जमा केलेले आहेत. सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर जवळपास ३०० अर्ज मंजूर झालेले आहेत. परंतु या ३०० लोकांना अजूनपर्यंत शिधापुस्तिका मिळालेली नाही. शिधापत्रिका शासनाच्या विविध योजनेसाठी कामी पडत असते. शिधापत्रिका जर असली तर त्यांना धान्य मिळत असते. परंतु तहसील कार्यालयामध्ये या शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
कोट
केशरी रंगांच्या शिधा पुस्तिका उपलब्ध नाही. चंद्रपूर कार्यालयाला मागणी करण्यात आली आहे. पुरवठा झाल्यावर लाभधारकाना वितरित करण्यात येईल.
-संजय नागटिळक तहसीलदार, चिमूर