हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

By admin | Published: October 25, 2014 10:38 PM2014-10-25T22:38:15+5:302014-10-25T22:38:15+5:30

पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात.

Hundreds of billions of crores of smoke will be stopped | हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

Next

चंद्रपूर : पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात. फटाक्यांवरील एवढा मोठा खर्च टाळावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.
सामाजिक वनिकरण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील हरितसेनेच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा धूर थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फटाक्यांमुळे इतरांची झोप उडवून हवा व ध्वनिप्रदूषित करणे टाळून पर्यावरण रक्षण करुन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. सण, उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाला उधान, त्यातच दिवाळी म्हटले की विचारायलाच नको. फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण. प्राचिन काळी चीन देशात फटाके उडवून मोठे ढोल वाजवून सैतान-भूत पळून जातात म्हणून फटाके फोडले जात होते. १२५ डेसिबलचे बॉम्ब फोडून आपण हवा, ध्वनिप्रदूषण प्रचंड प्रमाणात करुन पर्यावरणाचा नाश करीत आहोत. फटाक्याचा आवाज लहान मुलांमध्ये भीती निर्माण करतो. आजाऱ्यांची फटाके झोप उडवितात. आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलपेक्षा वाढली की अनेक त्रास होतात. रक्तदाब वाढतो, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण वाढतो. निद्रानाश होतो. आम्लपित्तात वाढ होते. ऐकण्यात दोष निर्माण होतो. अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. या सर्वाबरोबरच फटाक्यावरचा खर्च अनुत्पादक आहे. यासाठी लागणारा कागद, कच्चा माल हा फटाक्याबरोबरच जळतो. फटाक्यामुळे एक प्रकारे आपण बालमजुरीला प्रोत्साहन देत असतो. फटाके तयार करताना, फटाके वाजविताना तसेच फटाका भांडाराला नेहमीच आग लागून अपघात घडतात. ही समाजविघातक कृती आपण लवकरात लवकर थांबवून परिवर्तन घडविणे गरजेचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे. फटाका ज्वलनाने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड यासारखे घातक वायू निघतात. त्यामुळे खोकला, दमा हे आजार होतात.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of billions of crores of smoke will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.