‘आम्हाला गावाला जाऊ द्या’ आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 08:34 PM2020-05-02T20:34:47+5:302020-05-02T20:35:13+5:30

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैद्राबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या..आम्हाला गावाला जाऊ द्या.. असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

Hundreds of construction workers took to the streets chanting 'Let us go to the village' | ‘आम्हाला गावाला जाऊ द्या’ आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर

‘आम्हाला गावाला जाऊ द्या’ आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैद्राबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या..आम्हाला गावाला जाऊ द्या.. असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर या मजुरांची मागणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड व इतर राज्यातील हा मजूरवर्ग गेल्या तीन-चार महिन्यांपासून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे हे मजूर येथेच अडकून पडले आहेत. त्यांनी सोबत आणलेले पैसेही आता संपले आहे. अशातच तिसऱ्यांदा देशात लॉकडाऊन वाढविल्यामुळे या मजुरांची चांगलीच अडचण झाली. त्यांना मजुरीची रक्कमही मिळाली नाही. लॉकडाऊननंतर घरी पाठविण्यासाठी शापूरजी पालनजी या कंत्राटदार कंपनीने प्रत्येकांना काही रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही रक्कमही अद्याप मिळाली नाही, असा या मजुरांचा आरोप आहे.
काहीच जवळ नसल्यामुळे या मजुरांची उपासमार सुरू झाली. तिकडे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. त्यांच्याकडेही पैसा पाणी नाही. अशा परिस्थितीत आपण कसे जगायचे आणि कुटुंबांना कसे जगवायचे, असे बिकट प्रश्न या मजुरांना भेडसावू लागले. अखेर त्यांच्या सहनशिलतेचा बांध आज फुटला. बांधकामावरील शेकडो मजूर अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून जाणाºया चंद्रपूर-हैद्राबाद मार्गावर येऊन आक्रोश करू लागले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी धाव घेऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही सुरुवातीला विफल झाला. अखेर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फतीने आंदोलकांची घरी जाण्याची मागणी मान्य करण्यात आली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या मजुरांना सोमवारी त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनी शापूरजी पालनजीवर सोपविली आहे. प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरंभण्यात आली आहे.

शापूरजी पालनची या कंत्राटदार कंपनीच्या वतीने हा मजूरवर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करीत होता. त्यांना आपल्या गावाला जायचे आहे. त्यांना गावाला पाठविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना गावाला पाठविण्याचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले जात आहे.
- डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.


कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा - विदर्भ किसान मजदूर काँग्रेस
चंद्रपूर येथे चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे बांधकामावर असलेले बाहेर राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत. त्यांच्या कंत्राटदाराने त्यांचे वेतन दिले नाही. जेवनाची व्यवस्थासुध्दा केली नाही. त्यामुळे कामगारात असंतोष निर्माण झाल्याने या कामगारांना आंदोलन करावे लागले. यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था करून देण्यात येईल. तसेच थकीत असलेले पगार मिळवून देऊ , असे आश्वासन दिले असले तरी बेजबाबदारपणे वागणाºया संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसतर्फे कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केली आहे.

Web Title: Hundreds of construction workers took to the streets chanting 'Let us go to the village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.