कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींमुळे शेकडो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:41+5:30

प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : २ लाख थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती ...

Hundreds of farmers confused due to debt-free scheme errors | कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींमुळे शेकडो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींमुळे शेकडो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Next
ठळक मुद्देराजुरा तालुक्याची यादी जाहीर : निकषात बसणाºया रकमेची नोंदच नाही

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : २ लाख थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यामध्ये थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावे नसल्याचे समोर आले. काही शेतकऱ्यांकडे कर्ज असूनही कर्जमाफीच्या निकषात बसणारी रक्कम न दाखविता कमी रकमेची कर्जमाफी नोंदविली. त्यामुळे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यामुळे यादी केव्हा प्रकाशित होणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, नुकतेच या याद्या प्रकाशित झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी बँक पासबुक व आधार प्रमाणिकरणही पूर्ण केले. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर्जमाफीची कमी रक्कम याद्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफी झाली की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जमाफीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी रक्कम दाखविण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी जास्त कर्ज घेऊनही त्याची कमी रक्कम सदर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे.

जाचक अटींचा फटका
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची ही योजना शासनाच्या जाचक अटींमुळे लाभदायक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा सूर शेतकरी वर्गात ऐकायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते आनंदित झाले आहे. बहुसंख्य पात्रताधारक शेतकºयांपर्यंत शासनाची कर्जमुक्तीची योजना पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

शासनाने थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती योजनेच्या याद्या गावात प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु कर्जाची जादा रक्कम घेऊनही यादीमध्ये कर्जाची रक्कम कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत शंका आहे.
- सुरेंद्र पिंपळकर,
शेतकरी, गोवरी

काही शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत कर्ज घेतले. अशा शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची रक्कम यादीत कमी दाखविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर तक्रार करावी. लवकरच निवारण केले जाणार आहे.
- डॉ. रविंद्र होळी,
तहसीलदार, राजुरा

Web Title: Hundreds of farmers confused due to debt-free scheme errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.