शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:15 PM2018-07-08T23:15:42+5:302018-07-08T23:16:01+5:30

गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले.

Hundreds of hectares of agriculture land | शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

Next
ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : शेतातील पिके वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. शेतीचे आता वाळवंट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे शिवार पूर्णत: मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने पुन्हा नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावर्षीचा सर्वाधिक पाऊस या दोन दिवसात पडला. जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, चंद्रपूर, सिंदेवाही या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. इतर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. या संततधार पावसाने अचानक नदी, नाल्याला पूर आला. या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, चिंचोली, भोयेगाव, अंतरगाव, मुठरा, चंदनवाही, कळमना, नाईकनगर, पांढरपौनी, हरदोना, कढोली (बु.) साखरी, वरोडा, पार्ली, निर्ली मानोली, बाळापूर, नदी पड्यातील पुरामुळे अक्षरश: खरडून गेली. यासोबत सिंदेवाही, मूल, नागभीड या धानपट्टयातील धानपºहे पाण्याखाली येऊन भूईसपाट झाले. गडचांदूरजवळच्या कारवा येथील सात एक शेती तर पूर्णता वाहून गेली.
शेतकºयांनी नुकतीच कपाशी, सोयाबिन लागवड करुन खत देऊन पिकांची जोपासना केली होती. कसेबसे पीक वाढून डवरीणवर आले असताना पुरामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
भोवरी येथील शेतकरी भाऊराव रणदिवे, अनिल रणदिवे, अमित रणदिवे यांचे शेत पुरामुळे अक्षरश: खरडून नेले तर नाल्याकाठावरील बंडू जुनघरी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचल्याने पिक दिसेनासे झाले आहे. हे फक्त याच शेतकºयांचे नुकसान नाही तर जिल्ह्यातील नदी,नाल्याच्या काठावर असणाºया शेकडो हेक्टर शेतीला पुराचा जबरदस्त तडाखा बसल्याने पिकेच पूर्णत: भूईसपाट झाली आहे. शेतकºयांनी पै पै गोळा करुन पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाचा प्रकोप आल्याने शेकडो हेक्टर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांवर डोक्यावर हात ठेऊन अश्रू गाळण्याची दुदैवी वेळ आली आहे.
शेतीचे साहित्य, खते वाहून गेली
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेली शेती उपयोगी सर्वच साहित्य पुरात वाहून गेले. काही शेतकºयांनी पिकांना खत देण्यासाठी शेतात नेऊन ठेवले होते. पण अचानक आलेल्या पुरामुळे महागडे खत, कुटार, कडबा सर्वच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढविले आहे.
आश्वासन नको, तात्काळ मदत द्या
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांजवळ एक पैसाही शिल्लक नाही. शासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले असून सर्व्हेक्षण सुरू आहे. मात्र शासनाने पूरग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत दिली नाहीतर शेतकºयांना आपल्या शेतात पैशाअभावी काहीच पेरता येणार नाही. बि-बियाणे घेण्यासाठी शेतकºयांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. त्यासाठी आश्वासन नको तात्काळ मदत द्या, असा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी कायम संघर्षच
पाऊस येऊनही बुडवेल आणि जाऊनही बुडवेल, अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. असाच काहीसा संघर्षमय प्रवास शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. संततधार पावसाने क्षणार्थात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक़ संकटात सापडला आहे.

पुरामुळे राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य.

Web Title: Hundreds of hectares of agriculture land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.