बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

By Admin | Published: July 13, 2016 01:59 AM2016-07-13T01:59:50+5:302016-07-13T01:59:50+5:30

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला.

Hundreds of houses collapsed in Balarpur taluka | बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

googlenewsNext

चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले : विसापूर, कळमना, कोठारीत जास्त नुकसान
बल्लारपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला. अतिवृष्टीने पळसगाव येथील दोन कुटुंबाचे, कोठारी येथील एकाचे तर विसापूर येथे एका कुटुंबाचे घरे जमीनदोस्त झाल्याने स्थानिक व तहसील प्रशासनाने सुरक्षितस्थळी तात्पुरता निवारा दिला आहे. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १०० वर घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बल्लारपूर शहरात विविध वॉर्डात १५ ते २० घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णता पडली आहेत. पळसगाव येथील संतोष घोडे व झिंगुबाई घोडे यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंबाना गावातील समाज मंंदिरात निवारा देण्यात आला. विसापूर येथील रविंद्र कष्टी व भाऊजी कष्टी यांचे घरे पडली असून शेजाऱ्यांच्या घरी आसरा घेतल्याची माहिती आहे. कोठारी येथील एका कुटुंबाला निसर्गाने निवारा हिरावल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
विसापूर, चुनाभट्टी येथील नागरिकांचे २० ते २५ घरे अशंंता पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कळमना, कोठारी, नांदगाव (पोडे), किन्ही, कोर्टीमक्ता, बामणी (दुधोली), पळसगाव, गिलबिली, मानोरा आदी गावातील १०० वर घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तहसीलदार विकास अहीर यांनी तलाठी विनोद गणफाडे, आर.जी. चव्हाण, शंकर खरुले, शकुंतला कोडापे यांच्यासह पंचायत समितीचे अभियंता श्रीवास्त, नगर पालिकेचे अभियंता यांना पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे तहसीलदार विकास अहीर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)

चारगाव व हडस्तीचा संपर्क तुटला
वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी इरई नदीवरील चारवट व हडस्ती गावाकडे जाणाऱ्या पुलावर पाच ते सहा फुट पाणी असल्याने बल्लारपूर तालुक्याशी मंगळवारी सकाळपासून संपर्क तुटला. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती व बल्लारपूर येथील शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. अशीच स्थिती वर्धा नदीच्या काठावरील दहेली, लावारी, कळमना, आमडी, कोठारी, पळसगाव येथे निर्माण झाली आहे. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

 

Web Title: Hundreds of houses collapsed in Balarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.