अड्याळ टेकडीवर शेकडो गावांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:19 PM2017-11-28T23:19:12+5:302017-11-28T23:20:03+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिदर्शी विचारांनी प्रभावित होऊन ग्रामजीवनात विकासाचे मन्वंतर घडविणाऱ्या तुकारामदादा गीताचार्य स्थापित अड्याळ टेकडी येथील पे्ररणाभूमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवारी पहिल्या दिवशी परिसरातील शेकडो गावांनी श्रमदान केले.

Hundreds of hundreds of villages on Adil hill | अड्याळ टेकडीवर शेकडो गावांचे श्रमदान

अड्याळ टेकडीवर शेकडो गावांचे श्रमदान

Next
ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवाला प्रारंभ : नवेगाव पांडव, मिंथूरने ठेवला शिदोरी महाप्रसाद

आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिदर्शी विचारांनी प्रभावित होऊन ग्रामजीवनात विकासाचे मन्वंतर घडविणाऱ्या तुकारामदादा गीताचार्य स्थापित अड्याळ टेकडी येथील पे्ररणाभूमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवारी पहिल्या दिवशी परिसरातील शेकडो गावांनी श्रमदान केले. भू-वैकुंठात राज्यभरातील दाखल झालेल्या गुरुदेव भक्त आणि उपस्थित सर्व नागरिकांच्या महाप्रसादासाठी नवेगाव व पांडव व मिंथूर येथील गावांनी माधुकरी पद्धतीनुसार शिदोरी महाप्रसादाची व्यवस्था करून लोकसहभागाची परंपरा कायम ठेवली.
प्रेरणाभूमी अड्याळ टेकडी येथे विदर्भातील १३ जिल्ह्यांमधून हजारो गुरुदेव भक्त भू-वैकुंठात दाखल झाले आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुकारामदादा गीताचार्य यांच्या विचाराने प्रेरीत झालेले सेवाव्रती मिळेल त्या वाहनाने तसेच पायदळ भू-वैकुंठात दाखल झाले आहेत. ग्रामगीतेतील ओव्या मुखोद्गत असलेले गुरुदेवभक्त अत्यंत तल्लीनतेने आज टेकडीवर हजर झाले. टाळ मृदंगाच्या नादात टेकडीवरील वातावरणात प्रसन्नता आली आहे. गुरुदेव सेवामंडळ अड्याळ, चोरटी, लाखापूर, मांदेड, टेंभरी, चिचाळ, मोखारा, पांढरवाणी, टेऊळगाव, मिंथूर, नवेगाव, पांडव, ढोरपा, अºहेरनवरगाव, चौगान, कसर्ला, पांजरेपार, कोटगाव, भिकेश्वर, कोनबी (चक), उर्जानगर (चंद्रपूर), आमगाव (आदर्श), नागपूर येथील गुरुदेव भक्त आणि ग्रामस्थांचा श्रमदानाच्या पहिल्या दिवशी सहभाग होता. श्रमदानाचा लोकोपयोगी उपक्रम समारोपीय कार्यक्रमापर्यंत पुन्हा विस्तारीत होणार आहे. उद्यापासून अध्यात्म सत्र ते ग्राम आरोग्य आदी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार, चंदूपाटील मारकवार, लेखामेंढा येथील देवाजी लोफा, गाव गणराज्य चळवळीचे हिरामण वरखेडे आदी मान्यवर अनुभव कथन करणार आहेत. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी झटणारे मोहन चोरे, भाऊसाहेब थुटे, प्रवीण देशमुख आदींचे प्रबोधनपर कीर्तन होणार आहे.
शिक्षणासोबतच उद्यमशिलतेचे धडे
नागभीड/तळोधी (बा) : अड्याळ टेकडीवर आत्मानुसंधानासोबतच बदलत्या काळाची गरज म्हणून उद्योगांचे धडेही दिल्या जात आहेत. या जीवनोपयोगी उद्योगश्रमात १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेला जीवनशिक्षण विचार कृतीत उतरविण्यासाठी तुकाराम दादांनी अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात उद्योग कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू केला. पण दादांचे निर्वाण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम बंद पडला होता.
मान्यवरांनी घेतले प्रेरणास्थळाचे दर्शन
जि. प. चे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे कृष्णा सहारे, अर्चना जीवतोडे, प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, विलास चव्हाण, डॉ. शिवदास कुंभारे, नरेंद्र जीवतोडे, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपक्रमांची पाहणी करून प्रेरणास्थळाचे दर्शन घेतले.

Web Title: Hundreds of hundreds of villages on Adil hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.