निवडणुकीसाठी आल्या शाईच्या शेकडो बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:14 PM2019-03-29T22:14:09+5:302019-03-29T22:14:50+5:30

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे.

Hundreds of ink bottles for election | निवडणुकीसाठी आल्या शाईच्या शेकडो बाटल्या

निवडणुकीसाठी आल्या शाईच्या शेकडो बाटल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असते ती म्हणजे, मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रूपयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शाईच्या २६ लाख बाटल्यांची आर्डर दिली आहे.
देशभरात ९० कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या २६ लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास ३३ कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला ११ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून १९ मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. २००९ च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीन पट वाढ झाली आहे. २००९ मध्ये निळ्या शाईची किंमत १२ कोटी रुपये होती. तर मागील २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत.
एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू लकतो.
२००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र २००६ रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ लाईन आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वात जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो.
मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाºया प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये विधानसभानिहाय केंद्रामध्ये शाही पाठविण्यात येणार असून बॉटल बॉक्समध्ये बंद करण्यात आल्या आहे.
म्हैसूरची शाई प्रसिद्ध
देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत असल्याने या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. म्हैसूरची शाई ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार होते. या कंपनीकडून जगातील २५ देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाºया या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखली जाते.

Web Title: Hundreds of ink bottles for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.