कोट्यवधी रुपये, हजारो नोकऱ्या भाजपामुळे शक्य - हंसराज अहीर

By admin | Published: May 25, 2016 01:32 AM2016-05-25T01:32:02+5:302016-05-25T01:32:02+5:30

शेकडो कोटी रुपये आणि हजारो नोकऱ्या हे भाजपा मुळेच शक्य झाले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपा कटीबद्ध आहे, ...

Hundreds of rupees, thousands of jobs are possible due to BJP - Hansraj Ahir | कोट्यवधी रुपये, हजारो नोकऱ्या भाजपामुळे शक्य - हंसराज अहीर

कोट्यवधी रुपये, हजारो नोकऱ्या भाजपामुळे शक्य - हंसराज अहीर

Next

आरोप : काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
राजुरा : शेकडो कोटी रुपये आणि हजारो नोकऱ्या हे भाजपा मुळेच शक्य झाले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपा कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन वेकोलिच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पवनी दोन आणि तीन प्रोजेक्टसाठी ५५ कोटी वाटप झाले असून २०० कोटी पुन्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. एक हजारांच्या वर नोकऱ्या मिळणार आहे. कोलगाव, गोवरी डीप, पैनगंगा प्रकल्प, रत्नागिरी सिमेंट कंपनीला शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. परंतु त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. अशा हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.
नवीन दराने मोबदला मिळण्यासाठी भाजपाने मोठे आंदोलन उभे केले. सतत पाठपुरावा केला तेव्हा कुठे योग्य मोबदला मिळू लागला. हे केवळ भाजपामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कोसगावची जमीन अधिग्रहीत होणार असून भोयगाव, कवठाळा येथील शेकडो शेतकऱ्यांना त्यााच फायदा होणार आहे. अवार्ड झालेल्या जमिनी रद्द करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. हा सर्व पैसा केंद्र सरकारचा आहे.
२००८ पासून लढा उभा केला तेव्हा कुठे हा प्रश्न निकाली निघाला. चिचोली प्रोजेक्ट सुद्धा प्रक्रियेत असून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे ना.अहीर यांनी सांगितले. पवनीमध्ये तर केवळ २२ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते. ते वाढून भाजपामुळे ५५ कोटी मिळाले. ना. आपण सतत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत असल्याचे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)

ना.अहीरांच्या लढ्यामुळे न्याय मिळाला
राजुरा येथील काँग्रेसचे माजी आमदार भाव आम्हीच मिळवून दिला म्हणून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. राज्यात, राजुरा विधानसभा क्षेत्रात आणि संपूर्ण भारतात ना. हंसराज अहीर यांच्या संघर्षमय लढ्यामुळे प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत आहे, अशी माहिती वेकोलि विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ.संजय धोटे यांनी दिली. याप्रसंगी राहुल सराफ, राजु घरोटे, अरुण मस्की, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक एस.आर. मिश्रा, भाजपाचे शहर अध्यक्ष बादल बेले, भाजयुमोचे अध्यक्ष सचिन डोहे उपस्थित होते.

Web Title: Hundreds of rupees, thousands of jobs are possible due to BJP - Hansraj Ahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.