मनपा आयुक्तांच्या निवासासाठी बंगल्याची शोधाशोध !

By admin | Published: June 28, 2014 11:30 PM2014-06-28T23:30:23+5:302014-06-28T23:30:23+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते राहात असलेल्या रायगड या बंगल्यात आता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय दैने राहात असल्याने मनपाचे नवे

Hunt for municipal commissioner's residence! | मनपा आयुक्तांच्या निवासासाठी बंगल्याची शोधाशोध !

मनपा आयुक्तांच्या निवासासाठी बंगल्याची शोधाशोध !

Next

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते राहात असलेल्या रायगड या बंगल्यात आता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय दैने राहात असल्याने मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासाठी बंगलाच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे शंभरकर यांच्यासाठी मनपाने नव्या बंगल्याचा शोध सुरू केला आहे.
महानगरपालिकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी एन.बी. वटी यांनी काही काळ कार्यभार सांभाळला. त्यांना सुरूवातीपासूनच शासकीय बंगला मिळाला होता. त्यामुळे महानगरपालिकेला टेंशन नव्हते. महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच पहिले आयुक्त म्हणून प्रकाश बोखड रूजू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला सिव्हील लााईन्समधील रायगड नामक बंगला बोखड यांना देण्यात आला. या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले. तीन महिन्यापूर्वी प्रकाश बोखड सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रायगड बंगला रिकामा झाला. दरम्यानच्या काळात चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून राहिलेले आशुतोष सलील यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आणि त्यांच्या जागी संजय दैने यांची नियुक्ती करण्यात आली. रायगड बंगला रिकामा होता. त्यामुळे तो संजय दैने यांना देण्यात आला. आता महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले, पण त्यांना हक्काचे शासकीय निवासस्थान नसल्याने त्यांनी दोन दिवसांपासून शासकीय विश्राम भवनात मुक्काम ठोकला आहे. महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चुन नुतनीकरण केलेला बंगला नव्या आयुक्तांसाठी परत मिळावा, यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना मनपाचे पदाधिकारी भेटणार आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी संजय दैने बंगला सोडण्यास इच्छुक नाही. दैने यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बंगल्यावर २४ तास पाणी पुरवठा राहावा म्हणून नळाच्या मुख्य पाईपलाईनलाच होता घातला. प्रशासन आणि दैने यांच्यातील भांडण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला हा बंगला आता ते रिकामा करण्यासाठी तयार नसल्याने महानगरपालिका आणि महसूल विभाग यांच्यात पुन्हा वाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दरम्यान नवीन बंगला मिळेपर्यंत नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांना किरायाच्या घरात किंवा शासकीय विश्रामगृहात मुक्काम ठोकावा लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hunt for municipal commissioner's residence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.