शेजारील घराची भिंत कोसळून पती-पत्नी ठार, मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील घटना

By परिमल डोहणे | Published: September 1, 2024 12:45 PM2024-09-01T12:45:48+5:302024-09-01T12:46:38+5:30

सदर घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

Husband and wife killed when neighboring house wall collapsed, incident at Fiskuti in Mul taluka | शेजारील घराची भिंत कोसळून पती-पत्नी ठार, मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील घटना

शेजारील घराची भिंत कोसळून पती-पत्नी ठार, मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील घटना

भेजगांव (चंद्रपूर ) : मुल तालुक्यात काल दुपारपासूनच वरून राजाने मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली यात अनेक घरांची पडझड झाली. दिवसभर शेतात अंग मेहनतीचे काम करून घरी आल्यावर स्वयंपाक गुंतलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. शेजारी घराची भिंत कोसळून त्यात पती-पत्नी दबल्याने अशोक रघुनाथ मोहरले व पत्नी लता अशोक मोहरले गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र पती-पत्नीचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथील गव्हर्मेंट हॉस्पिटल ला मृत्यू झाला. 

सदर घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे सुमारे साडेसहा वाजता च्या सुमारास अशोक रघुनाथ मोहुर्ले यांच्या घरी त्यांची पत्नी लता अशोक मोहुर्ले या स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करीत होत्या. तर बाजूलाच बसून पती अशोक मोहुर्ले यांनी शेंगा खुडत बसले होते. दरम्यान शेजारी असलेल्या तयूब खा पठाण यांच्या घराची भिंत अशोक मोहुर्ले यांच्या स्वयंपाक खोलीवर कोसळली त्यामुळे स्वयंपाक करीत असलेल्या पती-पत्नीवर गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी धावाधाव करीत खमींना मातीच्या ढिगार्‍यातून बाहेर काढत उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले मात्र संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास पती अशोक मोहरले यांचा मृत्यू झाला तर रविवारला पहाटेच्या सुमारास पत्नी लता अशोक मोहुर्ले हिचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककडा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक अशोक रघुनाथ मोहुर्ले यांना चार मुली असून त्या सर्व  विवाहित आहेत. त्यामुळे त्यांनी आपापल्या दिल्या घरी संसार करीत असून फिस्कुटी येथे पती-पत्नी दोघांनीच राहत होते. केवळ अर्धा एकर शेती असल्याने कसाबसा मोल मोजरी करत आपल्या संसाराचा गाडा कुटुंब रेटत असतानाच दुर्दैवी घटना घडली. मृत पावलेल्या पती-पत्नीवर चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून आज रविवारला फिस्कुटी येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुल पोलिसांनी बिएनएस १९४ अंतर्गत आकस्मिक घटनेची नोंद केली. असून पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Husband and wife killed when neighboring house wall collapsed, incident at Fiskuti in Mul taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात