नियतीचा क्रूर खेळ; रविवारी पत्नीचा मृतदेह सापडला, धक्का पचवू न शकलेल्या पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:45 PM2020-06-22T16:45:55+5:302020-06-22T16:47:35+5:30

तीन महिन्याची गरोदर पत्नी विहिरीत बुडून मरण पावल्याचा धक्का सहन न होऊन तिच्या अंत्यसंस्कारावेळी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे सोमवारी दुपारी घडली.

Husband commits suicide while his newly married wife is being cremated | नियतीचा क्रूर खेळ; रविवारी पत्नीचा मृतदेह सापडला, धक्का पचवू न शकलेल्या पतीने केली आत्महत्या

नियतीचा क्रूर खेळ; रविवारी पत्नीचा मृतदेह सापडला, धक्का पचवू न शकलेल्या पतीने केली आत्महत्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: तीन महिन्याची गरोदर पत्नी विहिरीत बुडून मरण पावल्याचा धक्का सहन न होऊन तिच्या अंत्यसंस्कारावेळी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे सोमवारी दुपारी घडली.
किशोर पुरुषोत्तम खाटिक, रा. चिमूर (२९ )असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीचे नाव रुचिता असे आहे. रुचिता आपल्या माहेरी आली असता, रविवारी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. ती घरातून शौचास जात असल्याचे कारण सांगून बाहेर पडली होती. तिच्यावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येत असतानाच, तिचा पती किशोर खाटिक यानेही दुख: अनावर होऊन विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.

काय होती आधीची घटना
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणवीस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही महिला तीन महिन्याची गर्भवती होती. या घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतली नाही.

नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा व चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली. गोंडपिपरी पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनच्या अगदी पूर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

 

Web Title: Husband commits suicide while his newly married wife is being cremated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.