प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:26 PM2018-10-02T22:26:36+5:302018-10-02T22:26:54+5:30
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एका साथीदाराला अटक केली. उत्तम पत्रुजी मडावी असे मृत पतीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एका साथीदाराला अटक केली. उत्तम पत्रुजी मडावी असे मृत पतीचे नाव आहे.
सुरेखा मडावी (३७) रा. लोहारा, जगदिश नथ्यू पाचभाई (४२), विशाल रुपराव धुटे दोघेही रा. बोथली असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
जगदिश पाचभाई हा लोहारा येथे उत्तम मडावी यांच्या घरी मागील पाच महिन्यांपासून किरायाने राहत होता. दरम्यान, त्याचे उत्तमची पत्नी सविता मडावी हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र उत्तमला दारुचे व्यसन असल्याने तो आपल्या पत्नीशी नेहमी भांडण करीत होता. तसेच तो प्रेमसंबंधात व्यत्यय ठरत होता. त्यामुळे सुरेखाने आपल्या पतीचा काटा काढण्याचा डाव रचला. दरम्यान रविवारी जगदिशने आपला साथीदार विशालला लोहारा येथे बोलावले. त्यानंतर तिघांनी उत्तमला मारण्यासाठी सापळा रचून दोन दुचाकीने मूल येथे जेवण करण्यासाठी गेले. मूल येथे जेवण करुन परत येत असताना लोहाराजवळ थांबले. यावेळी जगदिशने मोठ्या काठीने उत्तमच्या डोक्यावर तीन वार केले. त्यामुळे उत्तमचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांनीही सर्व पुरावे नष्ट केले व तेथून पसार झाले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी चौकशी सुरु केली. मृत उत्तमच्या पत्नीला विचारपूस केली असता, पोलिसांना वेगळाच संशय आला. यावेळी पोलिसांनी आपला हिसका दाखविताच पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, पोलीस उपनिरिषक एस. डी. कापडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माऊलीकर यांच्यासह गुन्हे विभागाच्या चमूने केली.