हुश्श..बाधितांचा आलेख घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:31+5:30
शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७८ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील नऊ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण ११४ जणांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना काळातला आजचा दिवस जिल्ह्यासाठी आनंद व दिलासा देणारा ठरला आहे. मागील दोन महिन्यांपासून अतिशय जलदगतीने वाढणारा कोरोनाबाधितांचा आलेख शनिवारी अचानक घसरला. मागील दोन महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी नव्या केवळ ११४ बाधितांची भर पडली आहे. तर तब्बल ४०१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
शनिवारी जिल्ह्यात नवे ११४ बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या आता दहा हजार ८६७ झाली आहे. तीन हजार ५७४ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
सात हजार १३० बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करण्याची गरज असून असे केल्यानंतर कोरोनाबाधितांचा आलेख आणखी घसरण्यास मदत होणार आहे.
शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७८ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील नऊ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण ११४ जणांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील बाधित
बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह आढळले आहे. मूल येथील वार्ड नंबर एक, वार्ड नंबर १६, वार्ड नंबर १७ तसेच तालुक्यातील सिंताळा, राजुली भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बाजार चौक, स्नेहनगर, गुजरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगांव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, मजरा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, निमगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मदनापूर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.
एका बाधिताचा मृत्यू
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका बाधितेचा मृत्यू झाला आहे. भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील ७६ वर्षीय महिला बाधितेला १ ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
या बाधितेला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने तिचा रुग्णालयातच उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १६३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १५४ जणांचा समावेश आहे.
चंद्रपूर परिसरातील ७८ बाधित
चंद्रपूर शहर व परिसरातून ७८ बाधित पुढे आले आहेत. यात जीएमसी परिसर, शिवाजीनगर, बाबुपेठ, मुक्ती कॉलनी परिसर, नगिनाबाग, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट परिसर, मेजर गेट परिसर, चोर खिडकी, अष्टभुजा चौक, सुमित्रा नगर, एकोरी वार्ड, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, सिंधी कॉलनी परिसर, संजय नगर, घुटकाळा वार्ड, सिव्हील लाईन, समता नगर, समाधी वार्ड, स्नेह नगर, तुकूम, श्रीराम वार्ड, कोतवाली वार्ड, वृंदावन नगर, बंगाली कॅम्प, अरविंद नगर, इंदिरानगर, जयनगर वार्ड, विवेक नगर येथील बाधितांचा समावेश आहे.