मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:09+5:302021-08-25T04:33:09+5:30

बॉक्स घरातील वादाचा कंटाळा वडील दारू पिऊन घरी भांडण करत असल्याने मुलांना मारहाण करत असल्याने काहींनी घर सोडले तर ...

I left home to go to Mumbai and become a hero | मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर

मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर

Next

बॉक्स

घरातील वादाचा कंटाळा

वडील दारू पिऊन घरी भांडण करत असल्याने मुलांना मारहाण करत असल्याने काहींनी घर सोडले तर अभ्यास करण्यास अभ्यास कर म्हणून रागवल्यामुळे, शहरामध्ये मौजमजा करण्यासाठी, वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून, घरातील आर्थिक अडचणींमुळे, अल्पवयात प्रेमात पडल्यामुळे, मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने तर काहींना चित्रपटात हिरो बनायचे असल्याने घरातून पळून जात असल्याचे समोर येत आहे.

बॉक्स

म्हणून घर सोडले

मुंबईला जायचेय

मुंबईचे आकर्षण असल्याने शहर फिरायचे तसेच मौजमजा करायची या कारणाने अनेकजण घरी कुणालाही काही न सांगता पळून जातात तर काहीजण चित्रपटांमध्ये कोणतेही काम करण्याच्या उद्देशाने मुंबई जातात.

बॉक्स

शाळेतील अभ्यासाचा कंटाळा करत असल्याने पालक अभ्यास कर म्हणून सांगतात. परंतु, मुलांना ती सततची कटकट वाटत असल्याने काहीजण अभ्यासापासून सुटका मिळविण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडतात. तर काहीजण वडील मोबाईल घेऊन देत नाही म्हणून पळ काढतात.

कोट

० ते १८ वयोगटांतील मुले विविध कारणांने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. अशांचे चाईल्डलाईनच्या माध्यमातून समुपदेशन करून त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात येते. अडीच वर्षात १४९ जणांना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. यासाठी लोकसम्रगह समाजसेवा संस्था, शासनाची रेल्वे चाईल्ड लाईन यासह पोलीस, रेल्वे विभाग, बालकल्याण समिती,बाल संरक्षण कक्ष आदींचे सहकार्य लाभत असते.

भास्कर ठाकूर, समन्वयक अधिकारी, चाईल्डलाईन, संस्था

Web Title: I left home to go to Mumbai and become a hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.